Join us

BIRTHDAY SPECIAL : ​साजिद खानबद्दल जाणून घ्या 'या' रंजक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2016 9:59 AM

दिग्दर्शक व अभिनेता साजिद खान यांचा आज (23 नोव्हेंबर) वाढदिवस़.  कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खानचा तो भाऊ़. साजिदने आत्तापर्यंत सहा चित्रपट बनवले़....

दिग्दर्शक व अभिनेता साजिद खान यांचा आज (23 नोव्हेंबर) वाढदिवस़.  कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खानचा तो भाऊ़. साजिदने आत्तापर्यंत सहा चित्रपट बनवले़.साजिद खानचा जन्म २३ नोव्हेंबर १९७१ रोजी मुंबईत झाला़ त्याच्या वडिलांचे नाव कामरान खान आणि आईचे नाव मेनका इराणी़ साजिदने मुंबईच्या मीठीबाई कॉलेजमधून पदवी घेतली़ वयाच्या सोळाव्या वर्षीच पार्टी आणि इव्हेंटसमध्ये त्याने डीजे म्हणून काम करणे सुरु केले़.'मैं भी डिटेक्टिव्ह’ या टीव्ही शोद्वारे साजिदने होस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली़. १९९६ मध्ये त्याने ‘इक्के पे इक्का’ हा म्युझिक काऊन्टडाऊन शो होस्ट केला़. हा शो सर्वाधिक चालणारा शो ठरला़. लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये या शोचे नाव नोंदवले गेले़.                                                                      फराह खान आणि साजिद खान'कहने में क्या हर्ज’ या शोमध्ये साजिदने तिहेरी भूमिका साकारली होती़. ‘साजिद नंबर1’ हा त्याचा स्टँडअप कॉमेडी शो तुफान गाजला. २००५ मध्ये त्याचा ‘सुपर साले’ हा शो आला़. २००८ मध्ये ‘साजिद्स सुपरस्टार’ हा टॉक शो त्याने होस्ट केला़ शिवाय ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोचा जज म्हणूनही तो दिसला़. ‘नच बलिये’चे सीझन ५ आणि ६च्या जजच्या खुर्चीवरही तो दिसला़.दिग्दर्शन‘डरना जरूरी है’ या चित्रपटाद्वारे साजिद दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरला़ यानंतर त्याने ‘बेबी’, ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल2’, ‘हिम्मतवाला’,‘हमशक्ल’ हे चित्रपट बनवले़. दिग्दर्शनाऐवजी साजिदने काही चित्रपटात कॅमिओही केला़. यात ‘हॅपी न्यू ईयर’, ‘मैं हू ना’, ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटांचा समावेश आहे़.प्रेमप्रकरणेसाजिद खान आणि मॉडेल गौहर खानसोबतचे प्रेमप्रकरण बरेच गाजले़ २००३मध्ये साजिद व गौहर अनेक पार्ट्यांना, मुव्ही प्रमोशनला एकत्र दिसले, मात्र कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले, या ब्रेकअपचे कारण कळले नाही़.                                                                        जॅकलिन फर्नांडिस आणि साजिद खान यानंतर जॅकलिन फर्नांडिससोबत साजिदचे नाव जोडले गेले़. ‘हाऊसफुल२’ दरम्यान साजिद व जॅकच्या अफेअरची चर्चा जोरात होती़. साजिद लवकरच जॅकसोबत लग्न करणार, इथपर्यंत वावड्या उठल्या़. पण खुद्द साजिदने या सर्व बातम्या नाकारल्या़.या पश्चात अभिनेत्री तमन्ना भाटिया व साजिदच्या अफेअरच्या बातम्याही आल्यात़ पण तमन्नाने या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले़.                                                                          साजिद खान आणि तमन्ना भाटिया