सुभाष घईंचा ‘परदेस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि एक अनोळखी चेहरा एका रात्रीत स्टार झाला. हा चेहरा कुणाचा तर अभिनेत्री महिमा चौधरी हिचा. याच महिमाचा आज वाढदिवस. पहिल्याच सिनेमात महिमाला बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. अर्थात याचा तिच्या पुढच्या करिअरला फार फायदा झाला नाही.महिमाचे खरे नाव रितु चौधरी. सुभाष घईंनी लॉन्च करण्यापूर्वी तिचे महिमा असे नामकरण केले. महिमाने अनेक चित्रपटांत काम केले. पण या चित्रपटांपेक्षा तिचे खासगी आयुष्यच लोकांच्या लक्षात राहिले. ब्रेकअप ते प्रेग्नंसीपर्यंत अनेक वादात ती अडकली.
सुभाष घईंवर कास्टिंग काऊचचा आरोपसुभाष घईंनी महिमाला पहिला ब्रेक दिला. पण याच सुभाष घईंवर पुढे महिमाने कास्टिंग काऊच सारखा गंभीर आरोप केला. असे म्हणतात की, महिमा व सुभाष घई यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार, 5 वर्षांत महिमाला घईंचे 3 सिनेमे करायचे होते. असे न केल्यास महिमाला आपल्या उत्पन्नातील 35 टक्के भाग घईंना द्यावा लागेल. हाच करार पुढे महिमा व सुभाष घईंच्या वादाचे कारण ठरला.
एकीकडे सुभाष घई यांनी महिमाला विदेशात परफॉर्म करण्यापासून रोखले तर दुसरीकडे महिमाने घईंवर करार तोडून ‘ताल’मध्ये तिच्याजागी ऐश्वर्याला घेतल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर यानंतर तिने सुभाषघईंवर अप्रत्यक्षपणे कास्टिंग काऊचचा आरोपही ठेवला.
लग्नापूर्वी प्रेग्नंट
2006 मध्ये महिमाने अचानक लग्न केल्याची खबर आली. घाईघाईत केलेल्या या लग्नामागे प्रेग्नंसी हे कारण होते. म्हणजेच महिमा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. महिमाने बिझनेसमॅन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नानंतर काहीच महिन्यात तिने मुलीला जन्म दिला होता. आता महिमा बॉबीपासून विभक्त झाली असून सिंगल मदर आहे.
लिएंडर पेसवर केले होते गंभीर आरोप
महिमा सर्वाधिक चर्चेत आली ती दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसवर केलेल्या आरोपामुळे. होय, 2005 मध्ये महिमा व लिएंडर रिलेशनशिपमध्ये होते. पण याचकाळात लिएंडरची संजय दत्तची एक्स-वाईफ रिया पिल्लईसोबतची जवळीक वाढली होती. (पुढे लिएंडरने रियासोबत लग्नही केले. नंतर त्यांचा घटस्फोटही झाला.)महिमाला हे कळले आणि तिने लिएंडरसोबत ब्रेकअप केले. यानंतर महिमाने जाहिरपणे लिएंडरने प्रेमात दगा दिल्याचा आरोप केला होता. लिएंडर पेसकडून प्रेमात दगा मिळाल्याचे तिने सांगितले होते. ‘लिएंडर एक उत्कृष्ट टेनिस प्लेअर आहे, पण माणूस म्हणून अजिबात चांगला नाही. त्याच्या आयुष्यात दुसरी महिला आहे, हे कळल्यावर मला मोठा धक्का बसला होता. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही. उलट मी पूवीर्पेक्षा अधिक सक्षम झाली आहे,’ असे महिमा म्हणाली होती.