BIRTHDAY SPECIAL : नाना पाटेकर - असा नट होणे नाही; वाचा त्यांचे फेमस डायलॉग्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 11:58 AM
सिनेमासृष्टीतील ‘नटसम्राट’ नाना पाटेकरांचा आज ६६ वा वाढदिवसाचा. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्मलेले नाना मनोरंजनाच्या क्षेत्रातही अग्रस्थानी आहेत. नितांत सुंदर ...
सिनेमासृष्टीतील ‘नटसम्राट’ नाना पाटेकरांचा आज ६६ वा वाढदिवसाचा. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्मलेले नाना मनोरंजनाच्या क्षेत्रातही अग्रस्थानी आहेत. नितांत सुंदर अभिनय आणि तडाखेबंद आवाजाच्या बळावर गेली अनेक वर्षे ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.मराठी असो वा हिंदी, नाटक असो वा सिनेमा, त्यांचे सगळेच काम अभिजात म्हणावे असेच आहे. संवाद बोलण्याची त्यांची विशिष्टशैली तर प्रसिद्ध आहे. सुमारे चार दशकांपासून या क्षेत्रात कार्यरत नाना सुरुवातीच्या काळात रागीट, तापट, चिडखोर व्यक्तीच्या भूमिकांसाठी ते चर्चेत आले.१९७८ साली आलेला ‘गमन’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांच्या दर्जेदार चित्रपटांमध्ये ‘तिरंगा’, ‘अब तक छप्पन’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘नटसम्राट’, ‘प्रहार’, ‘देऊळ’ अशा अनेक सिनेमांची नावे घेता येईल. कलात्मक चित्रपटांबरोबरच ‘वेलकम’सारख्या तद्दन मसालेदार चित्रपटांनादेखील आपल्या सहज अभिनयाने नवा अर्थ मिळवून दिला.मुरूड-जंजीरा येथे १ जानेवारी १९५१ रोजी नानांचा जन्म झाला. त्यांचे वडील दिनकर पाटेकर टेक्स्टाईल प्रिटिंग व्यवसायिक होते. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अतुल्य योगदानासाठी नानांना पद्मश्री पुरस्कारांने सन्मानित करण्यात आलेले आहे.नानांच्या वाढदिवसांनिमित्त त्यांना खास ‘नाना स्टाईल शुभेच्छा’ देण्यासाठी आम्ही देत आहोत नानांच्या अविस्मरणीय डायलॉग्सची ट्रीट. हे डॉयलॉग इतके प्रसिद्ध आहेत आहेत की, आजही लोक रोजच्या बोलण्यात ते सर्रास वापरतात. ‘नटसम्राट : नाना पाटेकरबेस्ट आॅफ नाना पाटेकर डायलॉग :* एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है.* अपना तो उसुल है...पहले लात, फिर बात, उसके बाद मुलाकात.* ये मुसलमान का खून है ये हिंदू का खून...बता इस में मुसलमान का कौनसा हिंदू का कौनसा, बता..* उपरवाला भी उपर से देखता होगा तो उसे शरम आती होगी...सोचता होगा मैंने सबसे खुबसुरत चीझ बनायी थी, इन्सान...नीचे देखा तो सब कीडे बन गये...कीडे!* अखबार के दम पर गरीबों के झोपडे बेचने निकली है.* सौ में से अस्सी बेईमान... फिर भी मेरा देश महान.* तुझे ऐसी मौत मारूंगा की तेरी पापी आत्मा अगले सात जनम तक, किसी दुसरे शरीर में घुसने के पहले काप उठेगी.* जान मत मांग...इसकी बाजार में कोई किमत नही है.* हम सब सिस्टिम का हिस्सा है...सिस्टिम डिसाईड करता है, अपुन फॉलो करता है.* साले अपने खुद के देश में एक सुई नहीं बना सकते...और हमारा देश तोडने का सपना देखते हैं.* हम भले ही उपरवाले को अलग अलग नाम से पुकारते है...लेकिन हमारा धरम एक है, मजहब एक है...इन्सानियत.* तुम्हारे नापाक कदम आगे मत बढाओ...तोडकर तुम्हारे गले में पहना देंगे.* ये तो लाल मिर्च है तिखी तिखी...हात लगाओ तो हात जले...मुंह लगाओ तो मुंह जले...दिल लगाओ तो दिल जले.* मराठा मरता है या मारता है!* धंदे में कोई किसी का भाई नहीं. कोई किसी का बेटा नहीं.