Join us  

'त्याने एका रात्रीची मागणी केली..'; कास्टिंग काऊचविषयी नीना गुप्ता यांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 4:54 PM

Neena gupta:  एका प्रसिद्ध निर्मात्याने त्यांच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली होती. याविषयी त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे.

प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीदेथील बेधडकपणे व्यक्त होणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. आजवर असंख्य गाजलेल्या नीना यांचं काही काळापूर्वीच सच कहूँ तो हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. यामध्येच त्यांनी कलाविश्वातील कास्टिंग काऊचविषयीदेखील मत मांडलं.  एका प्रसिद्ध निर्मात्याने त्यांच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली होती. याविषयी त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं असून कलाविश्वात कास्टिंग काऊच प्रकार कसा चालतो हे सांगितलं.

नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत कास्टिंग काऊचविषयी भाष्य केलं होतं. हेच त्यांनी त्यांच्या पुस्तकातही मांडलं आहे. कलाविश्वात कास्टिंग काऊच होणं म्हणजे जबरदस्ती किंवा असहाय्य वाटत नाही. तर ती आपली वैयक्तिक निवड असते असं त्यांनी म्हटलं आहे.

“मी माझ्या पुस्तकातून येत्या काळात या क्षेत्रात येणाऱ्या तरुणाईला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूड असो वा इतर कोणतंही क्षेत्र. कोणतीही व्यक्ती शरीरसंबंधांसाठी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हा तुमचा निर्णय असतो,” असं नीना गुप्ता म्हणाल्या. या पुढेच त्यांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचविषयी भाष्य केलं.

 “एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने मला हॉटेलच्या रुमवर भेटायला बोलवलं होतं. त्यावेळी त्याने चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात माझ्यासोबत एक रात्र घालवण्याची मागणी केली होती. पण, मी ही मागणी अमान्य करुन तेथून निघून आले.

पुढे त्या म्हणतात, “तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवायचे की नाहीत. किंवा, काही कॉम्प्रोमाइज करायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो. जर, तुम्ही कॉम्प्रोमाइजसाठी तयार नसाल तर अन्य १० मुली यासाठी लगेच तयार असतात. त्यामुळे जर मी हे काम केलं तर मलाही भूमिका मिळेल ही भावना तुमच्या मनात निर्माण होते. पण, हे कॉम्प्रोमाइज केल्यानंतरही तुम्हाला भूमिका मिळेच याची काही शाश्वती नसते. चित्रपट तयार करणं हा एक व्यवसाय आहे.त्यामुळे तो बिघडावा अशी कोणाची इच्छा नसते. कोणासोबतही शरीरसंबंध ठेवून त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर करुन घ्यावा असं कोणालाही वाटत नाही.

दरम्यान, नीना गुप्ता यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक गंभीरविषयांवर भाष्य केलं आहे. तसंच त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अंधारात असणाऱ्या गोष्टीही त्यांनी जाहीरपणे या पुस्तकात मांडल्या आहेत.

टॅग्स :नीना गुप्तासेलिब्रिटीबॉलिवूड