प्रियंका चोप्राचा आज वाढदिवस. आज ती 38 वर्षांची झाली. अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करणा-या प्रियंकाकडे सध्या बॉलिवूडचा एकही सिनेमा नाही. पण म्हणून तिची क्रेज कमी नाही. तूर्तास प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली. प्रियंका पतीपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. शिवाय प्रॉपर्टीच्या बाबतीतही ती निकच्या कितीतरी पुढे आहे.
होय, प्रियंका सुमारे 200 कोटींच्या प्रॉपर्टीची मालकीन आहे. तर निककडे 175 कोटींची प्रॉपर्टी आहे. प्रियंका व निक दोघांनाही लक्झरी लाईफ आवडते. दोघांकडेही महागड्या गाड्या आहेत, अलिशान बंगले आहेत.
लग्नानंतर प्रियंका व निक यांनी कॅलिफोर्नियात 144 कोटींचा एक अलिशान बंगला खरेदी केला होता. या बेडरूममध्ये 7 बेडरूम व 11 बाथरूम आहेत. प्रियंकाचा गोव्यातही एक बंला आहे. याची किंमत 20 कोटींच्या घरात आहे. मुंबईत प्रियंका ज्या ठिकाणी राहते त्या बंगल्याची किंमत 100 कोटी रूपये आहे.
प्रियंकाची वर्षाची कमाई जवळपास 23.7 कोटी रुपये इतकी आहे. ती एका स्टेज परफॉर्मन्ससाठी जवळपास पाच कोटी रुपये इतके मानधन घेते आणि चित्रपटात काम करण्यासाठी ती 8 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय ती ब्रॅण्ड्सची जाहिरात करते ज्यामुळे प्रियंकाला चांगले मानधन मिळते.
प्रियंकाकडे हार्ले डेव्हिडसन स्ट्रिट 500 रेसिंग बाईक आहे. तिची किंमत 4 लाख आहे. खतरों के खिलाडी3 होस्ट करत असताना प्रियंकाने ही पिंक कलरची बाईक खरेदी केली होती. प्रियंका व निककडे रोल्स रॉयल घोस्ट, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंच एस क्लास, पोर्श, कर्मा फिशर, बीएमडब्ल्यू 5 अशा महागड्या व अलिशान गाड्या आहेत.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती द स्काय इज पिंक चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत झायरा वसीम व फरहान अख्तर मुख्य भूमिकेत होते.हा चित्रपट समीक्षकांना खूप भावला. मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.