हॉलिवूड सिंगर, गायक व प्रियंका चोप्रा हिचा नवरा निक जोनस आज त्याचा २७ वा वाढदिवस साजरा करतो आहे. निक जोनास व प्रियंका चोप्रा डिसेंबर, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. प्रियंका चोप्रा हल्ली चित्रपटांपेक्षा तिचा नवरा निक जोनासमुळे जास्त चर्चेत असते. निक आणि प्रियांका यांच्या वयात तब्बल ११ वर्षांचे अंतर आहे. निक २६ वर्षांचा तर प्रियांका ३७ वर्षांची आहे. निकपूर्वी प्रियांकाचं नाव असीम मर्चंट, अक्षय कुमार, हरमन बावेजा आणि शाहिद कपूरसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकाप्रमाणेच निकच्या आयुष्यातही यापूर्वी अनेक जणी येऊन गेल्या आहेत. तब्बल आठ सेलिब्रेटींसोबत निकचं अफेअर होतं. मिली सायरस निकची पहिली गर्लफ्रेंड होती. तेव्हा निक फक्त तेरा वर्षांचा होता. निक आणि मिलीने २००६ मध्ये एकमेकांना डेट करणे सुरु केले होते. दोघं पहिल्यांदा चॅरिटी इव्हेंटमध्ये भेटले होते.
ओलिविया कल्पोसोबत निक जास्त वेळ रिलेशनशीपमध्ये होता. २०१३ मध्ये त्यांचं नातं सुरु झालं आणि तर २ वर्षांनंतर २०१५ मध्ये ते वेगळे झाले.
एका न्यूज पोर्टलच्या सुत्रांनुसार निक आणि केंडाल जेफरने २०१५ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती.