Join us

Birthday Special : आर. माधवनने त्याच्या विद्यार्थिनीसोबत केले लग्न, इंटीमेट सीनवेळी सेटवर उपस्थित असायची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 12:48 PM

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवनचा आज ४९वा वाढदिवस आहे.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवनचा आज ४९वा वाढदिवस आहे. माधवनचे पूर्ण नाव रंगनाथ माधवन असे आहे. माधवन अभिनेत्यासोबतच लेखक, दिग्दर्शक व सूत्रसंचालक आहे. चित्रपटसृष्टीत स्वतःच्या हिमतीवर आपले स्थान निर्माण केले आहे. खरेतर आर. माधवनला आर्मी जॉईन करायचे होते. 

आर. माधवनचे वडील टाटा स्टील कंपनीत मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह होते आणि आई सरोज बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. त्याला एक बहिण देखील आहे. तिचे नाव आहे देविका रंगनाथन. देविका युकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. माधव अभ्यासात अव्वल होता. १९८८ साली त्याला त्याच्या शाळेतून कल्चरल अॅम्बेसिडर म्हणून कॅनडामध्ये रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली होती. या व्यतिरिक्त माधवन एनसीसीचा चांगला कॅडेटदेखील होता. त्याला महाराष्ट्रातून बेस्ट कॅडेटने सन्मानितदेखील केले आहे. एनसीसीसी कॅडेटच्या माध्यमातून त्याला इंग्लंडला जाण्याची देखील संधी मिळाली होती. तिथे त्याने ब्रिटीश आर्मी, रॉयल नेवी व रॉयल एअर फोर्समधून ट्रेनिंग घेतली. 

अभ्यासात चांगले असण्यासोबत माधवनला इतर गोष्टीतही खूप रस आहे. त्यामुळे त्याला परदेशात जाण्याची संधी बऱ्याचदा मिळाली. १९९६ साली माधवनने त्याचा पोर्टफोलिओ मॉडेलिंग एजेंसीला दिला. त्याचे पर्सनॅलिटी पाहून त्याला जाहिरातीची ऑफर मिळू लागल्या.

१९९६ साली त्याने सँडलवूड टॉक जाहिरातीत काम केले. या जाहिरातीचे दिग्दर्शक संतोष सिवान यांनी मणिरत्नम यांना सांगितले की पुढील प्रोजेक्ट इरुवरमध्ये कास्ट केले. हा माधवनचा पहिला चित्रपट जो सुपरहिट ठरला.

त्यानंतर माधवनने चित्रपटसृष्टीत करियर करायचे ठरविले. माधवनला सिनेमा मिळवण्यासाठी जास्त धडपड करावी लागली नाही. त्यानंतर त्याचे एकानंतर एक चित्रपट हिट ठरत गेले आणि पाहता पाहता तो स्टार बनला. १९९८ साली माधवनने इंग्रजी सिनेमा इन्फर्नोमध्ये काम केले. यात त्याने भारतीय पोलिसाची भूमिका केली होती. माधवनला रहना है तेरे दिल में चित्रपटातून ओळख मिळाली.

माधवनच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर त्याने सरीता बिर्जेसोबत लग्न केले. माधवन व सरीताची ओळख कोल्हापूरमध्ये झाली होती. तिथे ती माधवनचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास अटेंड करायला आली होती. तिचा मेंटॉर माधवन होता.

जेव्हा सरीताला एअर हॉस्टेसची नोकरी मिळाली. तेव्हा ती माधवनचे आभार मानण्यासाठी तिने डिनरला निमंत्रित केले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. जवळपास ८ वर्ष डेट केल्यानंतर १९९९ साली ते दोघे लग्नबेडीत अडकले. त्या दोघांना एक मुलगा आहे. ज्याचे नाव वेदांत आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार चित्रीकरणावेळी इंटीमेट सीनवेळी तो त्याच्या पत्नीला सेटवर घेऊन यायचा. 

टॅग्स :आर.माधवन