Join us

Birthday Special : या एका घटनेने बदलले रागेश्वरीचे आयुष्य, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 8:00 AM

आँखे, मुंबई से आया मेरा दोस्त, तुम जियो हजारों साल, दिल कितना नादान है, मैं खिलाडी तू अनाछी, जिद अशा अनेक चित्रपटांत मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री राजेश्वरी लुम्बा तुम्हाला आठवत असेलच. राजेश्वरी आठवण्याचे कारण म्हणजे, आज (25 जुलै) तिचा वाढदिवस.

ठळक मुद्दे2014 मध्ये रागेश्वरीने लग्नाचा निर्णय घेतला. पेशाने वकील असलेल्या सुंधाशू स्वरूप यांच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली.

आँखे, मुंबई से आया मेरा दोस्त, तुम जियो हजारों साल, दिल कितना नादान है, मैं खिलाडी तू अनाछी, जिद अशा अनेक चित्रपटांत मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री राजेश्वरी लुम्बा तुम्हाला आठवत असेलच. राजेश्वरी आठवण्याचे कारण म्हणजे, आज (25 जुलै) तिचा वाढदिवस.रागेश्वरी एक उत्कृष्ट अभिनेत्री होती, तितकीच एक उत्कृष्ट गायिकाही होती. तिचे अनेक अल्बम लोकप्रिय झाले होते. पण एक घटना अशी घडली की, रागेश्वरीच्या अख्खा आयुष्याला कलाटणी मिळाली. होय, सन 2000 मध्ये तिला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि रागेश्वरीचे अख्खे आयुष्य बदलले. शरीराचा डावा भाग पूर्णपणे लुळा पडला. तिला बोलताही येईना. अर्थात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द या जोरावर रागेश्वरी या आजारातून बरी झाली. सध्या ती लंडनमध्ये आपल्या पती व मुलीसोबत राहते.

 नव्वदीच्या दशकात रागेश्वरी जोरात होती. याचदरम्यान म्हणजे 2000 साली तिने कोकाकोलासोबत संपूर्ण भारतात कॉन्सर्ट करण्याची एक डिल साईन केली होती. या डीलसोबतच रागेश्वरी व तिच्या वडिलांनी ‘Y2K’ हा म्युझिक अल्बम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. याच अल्बमधील ‘इक्की चिक्की’ या गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना रागेश्वरीला मलेरियाने गाठले.

 या आजारातून रागेश्वरी लवकरच बरी होईल असे वाटत असताना काहीच दिवसांत रागेश्वरीला Bell's Palsy या आजाराचे निदान झाले आणि याच दरम्यान तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. हा अटॅक इतका मोठा होता की, रागेश्वरीच्या शरीराच्या डाव्या भागाची हालचाल मंदावली.  तिला बोलताही येईना.  पण  जिद्दीच्या जोरावर रागेश्वरी यातून बाहेर पडली. फिजियोथेरेपीच्या मदतीने तिच्या शरीराची डावी बाजू पुन्हा कार्यरत झाली. अर्थात रागेश्वरी पुन्हा बॉलिवूडमध्ये परतू शकली नाही.

या आजारातून पूर्णपणे बाहेर आल्यानंतर 2014 मध्ये रागेश्वरीने लग्नाचा निर्णय घेतला. पेशाने वकील असलेल्या सुंधाशू स्वरूप यांच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर  लंडनमध्येच स्थायिक झाली. तिला एका मुलगी असून सध्या ती  लंडनमध्ये मोटिव्हेशनल टीचर असून लोकांना योगा शिकवते. 

टॅग्स :रागेश्वरी