राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा जन्म 7 जुलै 1963 रोजी दिल्लीत झाला. 'रंग दे बसंती' ते 'भाग मिल्खा भाग' सारखे उत्कृष्ट चित्रपट बनवणारे राकेश ओमप्रकाश मेहरा हे बॉलिवूडच्या शानदार दिग्दर्शकांपैकी आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या संघर्षमय प्रवासाबाबत.
आज राकेश ओमप्रकाश मेहरा आज यशाच्या शिखरावर आहेत, पण त्यांचा इथंपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आपल्या 'द स्ट्रेंजर इन द मिरर' या पुस्तकात त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या कठीण टप्प्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, जेव्हा ते मुंबईत तेव्हा त्यांच्याकडे फक्त १०० रुपये होते. दिल्ली ते मुंबई असा राजधानी ट्रेनने प्रवास केला होता आणि टीसीच्या भीतीने ट्रेनच्या शेवटच्या बोगीत टॉयलेटजवळ बसला होते. त्यावेळी राजधानीचे तिकीट 460 रुपये होते, पण राकेशकडे पैसे नव्हते. त्याच्याकडे 100 रुपये आणि फक्त त्यांची स्वप्ने होती.
राकेश मेहरा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली. सुरुवातीला त्यांनी बऱ्याच ब्राँडससाठी काम केलं. यानंतप ते हळूहळू अॅड-फिल्ममधून फीचर फिल्मकडे वळले. २००१ मध्ये त्यांचा अक्स रिलीज झाला यातील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे कौतुक झाले, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. यानंतर त्यांनी २००६मध्ये 'रंग दे बसंती' सिनेमा तयार केला. ज्यानंतर राकेश मेहरा हे नाव घराघरात पोहोचले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला. यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल्ली-६, भाग मिल्खा भाग, तीन थे भाई, फन्ने खां सारखे अनेक सिनेमे त्यांनी तयार केले. आता ते कर्णावर सिनेमा तयार करतायेत. ज्याची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाही.
त्यांनी 22 वर्षात केवळ आठ चित्रपट केले. एक वेळ आली जेव्हा त्यांना स्वतःला संपवण्याची इच्छा होती. राकेश यांचा 'दिल्ली 6' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. ते इतके तुटला की दारूच्या आहारी गेले. राकेश मेहरा यांनी दारू पिऊन आत्महत्या करायची होती. मात्र, नंतर त्यांनी त्यातून स्वत:ne सावरले.