अभिनेता रणदीप हुड्डा आज (20 आॅगस्ट) वाढदिवस. सन १९७५ मध्ये आजच्याच दिवशी हरियाणाच्या रोहतकमध्ये रणदीपचा जन्म झाला होता. फार कमी काळात रणदीपने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘मान्सून वेडिंग’, ‘सरबजीत’ ते ‘लाल रंग’पर्यंतच्या अनेक चित्रपटातील त्याचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. २००१ मध्ये ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षे रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर २००५ मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केले आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अभिनयात येण्यापूर्वी रणदीपने ड्रायव्हर, वेटरचेही काम केले. मेलबर्नमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना एका चायनीज रेस्तरॉमध्ये रणदीपने वेटर होता. या काळात कार वॉशिंगचेही काम त्याने केले. दोन वर्षे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. २००० मध्ये रणदीप भारतात परतला, तो अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊनच. भारतात रणदीपने प्रायव्हेट एयरलाइनमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम केले आणि सोबतचं मॉडलिंगही सुरु केले. मॉडेलिंग करता करता अभिनेता बनण्यासाठी तो संघर्ष करत राहिला.
सुश्मिता सेनसोबतचे रणदीपचे लव्ह अफेअर चांबलेच गाजले होते. ‘कर्मा और होली’ नावाच्या एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात रणदीप व सुश्मिा या दोघांनी एकत्र काम केले होते. याचदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आलेत.रणदीप तेव्हा बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. तर सुश्मिता बी टाऊनची प्रस्थापित अभिनेत्री होती. पण ते एकमेकांच्या जवळ आलेत़ त्यानंतर हे दोघे अनेकदा एकत्र दिसले. रणदीप हा सुश्मिताच्या आयुष्यात आलेला तिसरा बॉयफ्रेन्ड होता. पण इतर अफेअर्सप्रमाणे रणदीपबरोबरचे तिचे अफेअर्सही लवकरच संपले.