Join us

BirthdaySpecial : अशी आहे ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरची लव्ह स्टोरी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 6:25 AM

 बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज (४ फेब्रुवारी) वाढदिवस. ९० च्या दशकात मोठा पडदा गाजवणारी उर्मिला सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही ...

 बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज (४ फेब्रुवारी) वाढदिवस. ९० च्या दशकात मोठा पडदा गाजवणारी उर्मिला सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण अनेक हिट सिनेमे तिच्या नावावर जमा आहेत. आता उर्मिला तिच्या संसारात रमली आहे. २०१६ मध्ये उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी स्वत:पेक्षा ९ वर्षे लहान असलेल्या मोहसीन मीर अख्तरसोबत लग्न केले. आज जाणून घेऊ या उर्मिला व मीरची लव्हस्टोरी...उर्मिला व मोहसीन यांची लव्हस्टोरी चांगलीच रोमॅन्टिक आहे. उर्मिलाने मोहसीनसोबत लग्न केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. कारण या मोहसीनचे नावही कुणी ऐकले नव्हते. तो कोण, कुठला कुणालाही काहीही ठाऊक नव्हते. नंतर हळूहळू उर्मिला व मोहसीन अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते, हे समोर आले. बॉलिवूडच्या एका मोठ्या फॅशन डिझाईनरने उर्मिला व मोहसीन या दोघांची भेट घडवून आणली होती. होय, मनीष मल्होत्रा याने उर्मिला व मोहसीन यांची भेट घडवून आणली होती.मोहसीन मीर अख्तर हा काश्मिरचा एक बिझनेसमॅन आहे. त्याचा कापडाचा बिझनेस आहे. जोया अख्तरच्या ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात मोहसीनने अभिनय केला होता, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्यासोबतच मोहसिन मॉडेलही आहे.  ‘मुंबई मस्त कलंदर’ यातही तो दिसला होता.   ए. आर. रहमान याच्या ‘ताजमहाल’ या म्युझिक व्हिडिओमध्येही मोहसिन झळकला होता.  २००७ मध्ये मिस्टर इंडिया कॉन्टेस्टमध्ये तो सेकंद रनर अप राहिला होता. पहिल्याच भेटीत उर्मिला व मोहसीन एकमेकांच्या पे्रमात पडले होते. रामगोपाल वर्मांच्या या सिनेमामुळे उर्मिलाला बॉलिवूडमध्ये ‘रंगीला गर्ल’च्या नावाने ओळखले जाऊ लागले. ‘रंगीला’नंतर ती रामगोपाल वर्मांची आवडती अभिनेत्री बनली होती. उर्मिलाने आपल्या करिअरमध्ये  चमत्कार,  रंगीला,  जुदाई, सत्या, मस्त ,  खूबसूरत, प्यार तूने क्या किया, भूत  यांसारखे अनेक हिट सिनेमे केले.२००८मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘कर्ज’ या सिनेमात ती अखेरची झळकली होती. २००५ ते २००८ याकाळात तिने काही सिनेमांमध्ये लहानसहान भूमिका साकारल्या होत्या.   त्यांनतर तिने ‘एटक’' या सिनेमातही काम केले. मात्र हाही सिनेमा अपयशी ठरला.  याचदरम्यान उर्मिलाने आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला. सुजय डहाके दिग्दर्शित ‘आजोबा' या सिनेमात ती दिसली. या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. मात्र या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.