रवि किशन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहे.
रवि किशन यांचा जन्म १७ जुलै, १९६९मध्ये जौनपूरमध्ये झाला आहे. त्यांनी भोजपुरी चित्रपटात काम करून लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर मुंबईत रवाना झाले. त्यांनी बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.
एका मुलाखती दरम्यान रवि यांनी त्यांच्या कठीण प्रसंगांबद्दल सांगितलं की, त्यांच्याकडे साडी विकत घेण्यासाठीदेखील पैसे नव्हते. मात्र रवि किशन यांनी तीन महिने वर्तमानपत्र विकून आईसाठी साडी विकत घेतली. पण, त्यांना आईच्या हातचा मार खावा लागला होता. जेव्हा त्यांनी आईला साडी कशी विकत घेतली हे सांगितलं तेव्हा त्यांनी मिठी मारली.