Join us

एक लव्ह स्टोरी ऐसी भी...! राज बब्बर यांचा नकार ऐकून रस्त्यावर अनवाणी धावली होती रेखा...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 8:00 AM

आज अभिनेते राज बब्बर यांचा वाढदिवस. राज बब्बर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. पर्सनल लाईफमुळेही ते चर्चेत राहिले.

ठळक मुद्देरेखाने राज बब्बर यांच्यासोबतच्या नात्याची कधीच कबुली दिली नाही. पण राज बब्बर यांनी मात्र एका मुलाखतीत या नात्याची कबुली दिली होती.

1975 ची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची बॅच... या बॅचमधून एक हँडसम तरूण बाहेर पडला आणि बॉलिवूडमध्ये त्याने एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. एनएसडीमधून बाहेर पडल्यापडल्या त्याला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. त्याचा पहिला सिनेमा ‘किस्सा कुर्सी का’ रिलीज झाला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आम्ही बोलतोय ते अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांच्याबद्दल. आज त्यांचा वाढदिवस. आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. पर्सनल लाईफमुळेही ते चर्चेत राहिले. (Rekha and Raj Babbar had torrid affair)

स्मिता पाटीलसोबतची त्यांची लव्हस्टोरी त्या काळात प्रचंड गाजली होती. पहिल्या पत्नीला सोडून राज बब्बर स्मिता पाटील यांच्याकडे आले आणि पहिल्या पत्नीला घटस्फोट न घेताच त्यांनी स्मिताशी लग्नगाठही बांधली. याशिवाय राज बब्बर यांच्या आणखी एका लव्हस्टोरीची चर्चाही दबक्या आवाजात एकेकाळी रंगली होती. ही लव्हस्टोरी होती राज बब्बर आणि रेखाची.होय, 1986 साली स्मिताच्या निधनानंतर राज बब्बर कोलमडून पडले होते. मनातून पार खचले होते. याचकाळात रेखा (Rekha) अमिताभ बच्चन यांच्यापासून दुरावली होती. असे म्हणतात की, याच काळात राज बब्बर व रेखा एकमेकांच्या जवळ आलेत. आयुष्यातील एकाकीपणामुळे दोघांना एकत्र आणले होते.

रेखा आणि राज बब्बर यांच्या लव्हस्टोरी जगापुढे आली नाही. तिची फार चर्चाही झाली नाही. पण असे म्हणतात की, रेखा राज बब्बर यांच्याशी लग्न करू इच्छित होती. पण राज बब्बर  या नात्याला नाव देण्यास तयार नव्हते.   राज बब्बर यांना आपल्या पहिल्या पत्नीकडे परत जायचे होते.  एके दिवशी राज यांनी रेखाला ही गोष्ट सांगितली आणि रेखा बिथरली. दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, रेखा राज यांना सोडून अनवाणी पायांनी चालत सुटली. रेखाने असे काही घडल्याचा इन्कार केला होता. पण तिला अनवाणी पायांनी रस्त्यावरून धावणारे काही लोक होते.  असं म्हणतात की हा दिवस त्यांच्या नात्याचा शेवट होता.  

रेखाने राज बब्बर यांच्यासोबतच्या नात्याची कधीच कबुली दिली नाही. पण राज बब्बर यांनी मात्र एका मुलाखतीत या नात्याची कबुली दिली होती.‘ आम्ही एकत्र काम करत होतो आणि एकमेकांना खूप चांगले ओळखायचो. परिस्थितीमुळे आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. मात्र एका काळानंतर रेखा स्वत:च या नात्यातून बोहर पडली. मी सुद्धा रेखासोबत इतका  कनेक्टेड नव्हतो जितका स्मिता सोबत होतो. आमच्यात ती इंटेन्सिटी नव्हती. मात्र आम्ही फक्त मित्र होतो, असे मी म्हणणार नाही, असे राज बब्बर त्या मुलाखतीत म्हणाले होते.   

टॅग्स :राज बब्बररेखा