‘मेरे डॅड की मारूती’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा आज (1 जुलै) वाढदिवस. एकेकाळी एमटीव्हीत व्हीजे असलेल्या रियाने बॉलिवूडमध्ये बºयापैकी ओळख कमावली आहे. तशी रिया कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये नसते. पण गतवर्षी महेश भट यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून रिया चांगलीच फसली होती.होय, रिया आणि महेश भट यांचा हा फोटो पाहून नेटक-यांनी रियाला चांगलेच ट्रोल केले होते. महेश भट यांच्या वाढदिवसानिमित्त रियाने हा फोटो शेअर केला होता. या फोटोचे कॅप्शनही खास होते.
‘मेरे बुद्धा को जन्मदिन की बधाई, सर ये हम है. आप ने मुझे प्यार से थामा. आपने मेरे साथ प्यार जताया़ आमने मुझे हमेशा आजाद होकर उडना सिखाया. आप एक ऐसा प्रकाश है, जो आपके संपर्क में आने वाले हर एक शख्स को रोशन कर देता है,’ असे तिने या फोटोसोबत लिहिले होते.
तिचा हा फोटो पाहून लोकांनी तिची अन् महेश भट यांची तुलना ‘बिग बॉस 12’ची वादग्रस्त जोडी अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्यासोबत केली होती.अनुप व जसलीन यांनी ‘बिग बॉस 12’मध्ये एन्ट्री घेताना, आम्ही गत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे, असा खुलासा केला होता. (कालांतराने हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता, असे स्पष्ट झाले होते.)त्यांच्या या खुलाशाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. नेमक्या या जोडीची चर्चा सुरु असतानाच रियाने महेश भटसोबतचा फोटो शेअर करून स्वत:च टीका ओढवून घेतली होती.
रियाने शेअर केलेल्या फोटोत महेश यांनी तिच्या खांद्यावर डोके ठेवलेले होते. ‘बिग बॉस का असर सारे देश में देखने को मिल राहा है,’ असे हा फोटो पाहून एका युजर लिहिले होते. केवळ इतकेच नाही तर ‘जवान लडके खतम हो गये क्या?’ असा सवाल करत एका युजरने रियाची खिल्ली उडवली होती.
रियाने या ट्रोलर्सला खरमरीत उत्तरही दिले होते. ‘तू कौन है, तेरा नाम क्या? सीता भी यहां बदनाम हुई..ट्रोल करने वालों क्या तुम लोगों को नहीं पता की, तुम जैसे हो, तुम दुनिया को भी वैसे ही देखत हो...,’ असे तिने लिहिले होते.