BirthDay Special : ‘या’ कारणाने झाला सैफ अली खान व अमृता सिंह यांचा घटस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 8:58 AM
अभिनेता सैफ अली खान याचा आज (१६ आॅगस्ट) वाढदिवस. सैफ अली खान त्याच्या फिल्मी लाईफपेक्षा त्याच्या रिअल लाईफमुळेच अधिक ...
अभिनेता सैफ अली खान याचा आज (१६ आॅगस्ट) वाढदिवस. सैफ अली खान त्याच्या फिल्मी लाईफपेक्षा त्याच्या रिअल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिला. फिल्मी करिअरपूर्वी लग्नबंधनात अडकणाºया काही निवडक अभिनेत्यांपैकी सैफ एक़ सैफने कमी वयात लग्नच केले नाही तर, केवळ 23 वर्षाचा असताना तो पहिल्यांदा वडीलही झाला. १९९१ मध्ये त्याने स्वत:पेक्षा १३ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहसोबत लग्न केले. सारा ही सैफ अली खानची थोरली मुलगी. १९९३मध्ये जन्मलेली सारा ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता यांची मुलगी आहे.साराच्या जन्मानंतर म्हणजे आठ वर्षांनी म्हणजे २००१ साली सैफ आणि अमृता यांचा मुलगा इब्राहिमचा जन्म झाला आणि पुढे २००४ मध्ये सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला. इटलीची मॉडेल रोजा हिच्यासोबतचे सैफचे अफेअर हे या घटस्फोटामागचे मुख्य कारण असल्याचे म्हटले जाते. काही दिवसांपूवर्र सैफची अनेक वर्षांपूर्वीची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात सैफने त्याची पहिली पत्नी अमृताबाबत धक्कादायक खुलासे केले होते.अमृता ही मला वारंवार नालायक म्हणून हिणवायची. माझी आई आणि बहिणीचाही सारखा अपमान केला जायचा. त्यांना टोमणे मारणे, अपमान करणे असे प्रकार सुरू असायचे. मी हे सर्व सहन केले आहे. पण आता यातून बाहेर आल्यासारखे वाटते, असे अमृतासोबतच्या घटस्फोटासंदर्भात सैफ बोलला होता. अर्थात मी मोठ्या धाडसाने वेगळा होण्याचा निर्णय घेतला. पण अमृता कायम माझ्या आयुष्याचा एक भाग राहील. तिने आणि माझ्या मुलांनी नेहमी आनंदी राहावे असे मला वाटते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता. 'अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफने करिना कपूरसोबत लग्न केले. ‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील प्रेम बहरले. अनेक वर्षे डेटींग केल्यानंतर २०१२ मध्ये सैफने स्वत:पेक्षा दहा वर्षे लहान असलेल्या करिनासोबत संसार थाटला. गतवर्षी डिसेंबरमध्ये करिनाने मुलाला जन्म दिला. १९९३ मध्ये यश चोप्रांच्या ‘परंपरा’ या चित्रपटातून सैफने बॉलिवूड डेब्यू केला होता. मात्र सैफचा हा पहिलाच चित्रपट आपटला. यानंतर याचवर्षी त्याचा ‘आशिक आवारा’ हा चित्रपट आला. हा चित्रपटही फ्लॉप राहिला. पण या चित्रपटाने सैफला बेस्ट मेल डेब्यूचा पुरस्कार मिळवून दिला. याच्या पुढच्या वर्षी आलेल्या ‘ये दिल्लगी’ या चित्रपटाने सैफला खरी ओळख दिली. यानंतर ‘मैं खिलाडी तू अनाडी’हा सैफचा चित्रपटही हिट झाला. यानंतर १९९५ ते १९९८ या काळात सैफचे एकापाठोपाठ एक असे नऊ चित्रपट आलेत. पण सगळेच दणकून आपटले. पण हे अपयश सैफने मोठ्या मनाने पचवले. १९९९ मध्ये ‘मुंबई मेरी जान’,‘कच्चे धागे’,‘आरजू’, ‘हम साथ साथ है’ असे चित्रपट त्याने केलेत, जे हिट राहिलेत. यानंतर ‘कल हो ना हो’,‘सलाम नमस्ते’,‘ओंकारा’,‘टशन’,‘परिणीता’, ‘हम तुम’ असे हिट चित्रपट त्याने दिलेत.