Join us

Birthday Special​ : शाहरूख खानच्या एका सल्ल्याने बदलले करण जोहरचे आयुष्य...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 5:42 AM

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहर आज (२५ मे) ४५ वर्षांचा झाला. या ४५ वर्षांत करणने जे यश ...

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहर आज (२५ मे) ४५ वर्षांचा झाला. या ४५ वर्षांत करणने जे यश मिळवले ते प्रशंसनीय आहे. करण जोहर आजच्या यशस्वी निर्मात्यांपैकी एक आहे. खरे तर करण जोहर हे नाव सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण त्याच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. आज करणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल जाणून घेऊ यात काही माहित नसलेल्या गोष्टी...वडिलांची होती वेगळीच इच्छानिर्माता यश जोहर आणि हिरू जोहर यांचा मुलगा करण जोहरला लोक केजो नावाने ओळखतात.  करणने अभिनेता बनावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. फ्रेंच कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी करण पॅरिसला गेला. याठिकाणी त्याचा मित्र आदित्य चोप्रा याने करणला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’साठी अस्टिस्ट करशील का विचारले आणि करणने होकार दिला.शाहरूखच्या सल्लयाने बदलले नशीबस्वित्झर्लंडमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चे शूटींग सुुरु असताना शाहरूख खानने करणला स्वत: दिग्दर्शक बनण्याचा सल्ला दिला. याचमुळे करणने ‘कुछ कुछ होता है’ बनवला. शाहरूखच्या सल्लयाने करणचे आयुष्यच बदलले.करणची लव्हलाईफकरण जोहरची प्रेम कहाणी अधुरी राहिली, असेच म्हणता येईल. करण जोहर एका बॉलिवूड अभिनेत्रीवर जीवापाड पे्रम करायचा. ही बॉलिवूड अभिनेत्री आज एका सुपरस्टारची पत्नी आहे. होय, ही अभिनेत्री म्हणजे टिष्ट्वंकल खन्ना. अक्षय कुमारची पत्नी. करणने अनेकदा टिष्ट्वंकलवरील प्रेमाची कबुली दिली आहे. ‘कॉफ विद करण’मध्ये खुद्द करणने अक्षयसमोर आपल्या या प्रेमाची कबुली दिली होती. करण आणि टिष्ट्वंकल दोघेही एकत्र बोर्डिंगमध्ये शिकायचे. करण आपल्या आई-वडिलांपासून दूर राहून सतत नाराज राहायचा. मग टिष्ट्वंकल त्याला बोर्डिंग स्कूलमधून पळून जाण्याचे वेगवेगळे पर्याय सुचवायची. त्याच वयात करण टिष्ट्वंकलवर प्रेम करू लागला . पण हे प्रेम एकतर्फी होते. टिष्ट्वकलने आपल्या ‘मिसेस फनीबोन्स’ या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. मी जेव्हा लहान होते, तेव्हा मला मिशी होती. कदाचित करण त्यावरच भाळला होता. तो नेहमी मला म्हणायचा, तुझी मिशी खूप छान आहे, असे टिष्ट्वंकलने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. करण लहानपणी खूप खादाड होता. तो कायम भुकेला असायचा. मी नेहमी त्याच्यासाठी चोरून खायला आणायचे, असेही तिने यात लिहिले आहे.- आणि सलमान खानने करणला अक्षरश: रडवलेहा किस्सा ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’च्या वेळचा आहे. आदित्य चोप्राच्या या चित्रपटामध्ये करण जोहर हा अस्टिस्टंट डायरेक्ट होता. या चित्रपटानंतर करणने ‘कुछ कुछ होता है’ बनवण्याचा निर्णय घेतला. यात शाहरूख खान व काजोल लिड रोलमध्ये होते आणि सलमानचा कॅमिओ होता. यादरम्यान  ‘साजन जी घर आयें’ या गाण्याचे शूटींग सुरु असताना सलमान करणला असे काही बोलून गेला की करणच्या डोळ्यात अश्रू आलेत. करणच्या कॉच्युम डिझाईनरने या गाण्यासाठी सूट डिझाईन केला होता. हा सूट सलमानला घालायला दिला गेला. पण सलमानला तो जराही आवडला नाही. करणने त्याच्या मान मान मिनता केल्या पण सलमान बधला नाही. मग काय, करण अक्षरश: रडू लागला. करणचे अश्रू पाहून सलमानही बधला आणि मग त्याने तोच सूट घालून शूटींग पूर्ण केले.‘के’ अक्षरावर होते प्रेमकरणने चित्रपट बनवणे सुरु केले तेव्हा त्याला ‘के’ या अक्षरावर प्रचंड प्रेम होते. तो आपल्या प्रत्येक चित्रपटाचे नाव ‘के’वरून ठेवायचा. पण त्याने राजकुमार हिराणीचा ‘लगे रहो मुन्नाभाई’ पाहिला अन् यानंत ‘के’ अक्षराचा वापर बंद केला. या चित्रपटात न्युमरॉलॉजीवर टीका केली गेली होती.काजोल नव्हे जुही होती पहिली पसंतALSO READ : करण जोहर झाला जुळ्या मुलांचा ‘कुंवारा’ बाप...‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी करण जुही चावलाला कास्ट करू इच्छित होता. पण जुहीने नकार दिला. मग कुठे काजोलची एन्ट्री झाली. त्याचप्रमाणे टीनाच्या रोलसाठी करण सर्वप्रथम रवीना टंडन, ऐश्वर्या राय, तब्बू, उर्मिला मातोंडकर व करिश्मा कपूरकडे गेला होता. या सगळ्यांनी सेकंड लीड होण्यास नकार दिला. मग टीनाची भूमिका राणी मुखर्जीने केली. चित्रपटाच्या सेटवर काजोल व सलमान खान अजिबात एकमेकांशी बोलायचे नाहीत. करणने कसे बसे करून दोघांना गोंजारून हा चित्रपट पूर्ण केला.