Join us

शाहरूख खानने कशी खर्च केली होती त्याची 50 रूपयांची पहिली कमाई, आता इतक्या कोटींचा मालक  

By रूपाली मुधोळकर | Published: November 02, 2020 10:13 AM

शाहरूखचा आज वाढदिवस... शाहरुख खानने त्याची पहिली कमाई कशी खर्च केली होती, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल.

ठळक मुद्देशाहरूख अ‍ॅक्टिंगमध्येच नाही तर बिझनेसमध्येही नंबर 1 आहे. कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीसोबत लक्झरी कारचा मालक आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा आज वाढदिवस. शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिलेत. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला शाहरूख आज बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. अ‍ॅक्टिंगसाठीच नाही तर आपल्या लक्झरी लाईफ स्टाईलसाठीही तो ओळखला जातो. आज शाहरूख अब्जावधींच्या संपत्तीचा मालक आहे. या शाहरूखची पहिली कमाई तुम्हाला ठाऊक आहे?  

छोट्या पडद्यापासून शाहरूखने त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्याआधी तो  एका थिएटरमध्ये तिकिट काऊंटरवर काम करत असे. ही शाहरुखची आयुष्यातील पहिली नोकरी होती. आयुष्यात त्याची पहिली कमाई होती 50 रूपये. होय, सगळ्यात पहिल्यांदा त्याने 50 रुपये कमावले होते.  लोक आपल्या पहिल्या कमाईतून स्वत:साठी काहीतरी वस्तू घेतात अथवा पहिल्या कमाईतून आईला, वडिलांना, भावांना, बहिणीला अथवा प्रेयसीला काहीतरी घेतात. पण शाहरुख खानने त्याची पहिली कमाई कशी खर्च केली होती, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. शाहरुखने त्याच्या पहिल्या कमाईतून आलेल्या पैशातून एका ठिकाणाला भेट दिली होती. शाहरुख हा मुळचा दिल्लीचा आहे. दिल्लीजवळ असलेला ताजमहाल पाहाण्याची त्याची अनेक वर्षे इच्छा होती. त्यामुळे शाहरुख त्याच्या पहिल्या कमाईतून खास आगºयाला ताजमहाल पाहायला गेला होता. 

 इतकी आहे कमाई शाहरूख अ‍ॅक्टिंगमध्येच नाही तर बिझनेसमध्येही नंबर 1 आहे. कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीसोबत लक्झरी कारचा मालक आहे. 2017च्या फोर्ब्स रिपोर्टनुसार, शाहरूखची एकूण संपत्ती 600 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 4200 कोटी रूपये आहे. 2018 मध्ये तो देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता रला होता. मुंबईत त्याचा मन्नत नावाचा बंगला आहे. आजघडीला या बंगल्याची किंमत 200 कोटी रूपये आहे. अलिबाग येथे त्याचे फार्महाऊस आहे. याची किंमतही कोट्यवधीच्या घरात आहे. याशिवाय दुबई, लंडनमध्ये त्याचे अलिशान बंगले आहेत. याची किंमत 170 कोटी रूपये आहे.

शाहरूख कोलकाता नाइट राइडर्स या आयपीएल टीमचा मालक आहे. त्याचे स्वत:चे रेड चिलीज नावाचे प्रॉडक्शन हाऊस आहे. याची वार्षिक उलाढाल 500 कोटींपेक्षा अधिक आहे. शाहरूख अनेक कंपन्यांचा ब्रँड अ‍ॅम्बिसीडर आहे. एका जाहिरातीसाठी तो सुमारे 10 ते 12 कोटी रूपये घेतो. सध्या तो जवळपास 10 कंपन्यांचा ब्रँड अ‍ॅम्बिसीडर आहे. याचा अर्थ यातून तो दरवर्षी सुमारे 100 कोटी रूपये कमावतो. याशिवाय तो अनेक अलिशान गाड्यांचा मालक आहे. 

टॅग्स :शाहरुख खान