Join us

बर्थडे स्पेशल: 'या' अभिनेत्रीसोबत होतं आलोक नाथ यांचं अफेअर, जाणून घ्या काही खास गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 1:51 PM

आलोक नाथ यांनी त्यांच्या करिअरमध्ये साधारण १४० सिनेमे आणि १५ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे.

बॉलिवूडचे बाबूजी अशी ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ यांचा आज वाढदिवस आहे. आज ते ६२ वर्षांचे झालेत. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आलोक नाथ यांचा जन्म १० जुलै १९५६ मध्ये दिल्लीत झाला होता. आलोक नाथ यांनी त्यांच्या करिअरमध्ये साधारण १४० सिनेमे आणि १५ पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे. यातील जास्तीत जास्त भूमिका त्यांनी बाबूजींच्याच केल्या  आहेत. पण त्यांच्या बाबूजी होण्यामागचं कारण तुम्हाला हैराण करून सोडेल.

आलोक नाथ यांची सुरुवात

आलोक नाथ हे सिनेमात आले तेव्हा त्यांना कधीही हिरोची भूमिका करण्याची इच्छा नव्हती. त्यांनी शालेय आणि कॉलेज शिक्षण दिल्लीतच झालं. त्यानंतर त्यांना पहिली संधी मिळाली ती 'गांधी' या १९८० साली आलेल्या सिनेमात. या सिनेमानंतर तब्बल पाच वर्ष त्यांना एकही सिनेमा मिळाला नाही. यादरम्यान ते नादिरा बब्बरसोबत शॉर्ट फिल्ममध्ये काम करत होते. त्यानंतर त्यांना दिलीप कुमार यांच्या 'मशाल' या सिनेमात एक छोटी भूमिका मिळाली. पुढे अशाच छोट्या छोट्या भूमिका ते करु लागले. नंतर १९८८ मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 

वडिलांच्या भूमिकेस दिला होता नकार

एक वेळ अशी होती की, अभिनेते जितेंद्र यांच्याकडे निर्माते आणि दिग्दर्शकांची लाइन लागलेली असायची. अशात एका सिनेमात आलोक नाथ यांना जितेंद्रच्या वडिलांची भूमिका करण्याची ऑफर मिळाली होती. पण आलोक नाथ यांनी नकार दिला होता. 

ऑन स्क्रीन रोमान्स

आलोक नाथ यांच्या संस्कारी किंवा बाबूजी भूमिकांचा इतका इम्पॅक्ट आहे की, लोक हे विसरतात की, त्यांनी काही रोमॅंटिक सिनेमातही काम केलं आहे. यातील एक सिनेमा होता 'कामाग्नि'. या सिनेमात त्यांनी केवळ अभिनेत्री टिना मुनीमसोबत केवळ रोमान्स केला नाहीतर या सिनेमात त्यांनी काही लव्ह मेकिंग सीनही दिले होते. 

अभिनेत्रीसोबत अफेअर

'बुनियाद' या सिनेमात आलोक नाथ फ्रिडम फायटरच्या भूमिकेत दिसले होते. या सिनेमात अभिनेत्री नीना गुप्ताचीही भूमिका होती. यादरम्यान नीना आणि आलोक नाथ यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. या सिनेमात नीनाने आलोक नाथ यांच्या लहान सूनेची भूमिका केली होती. 

टॅग्स :बॉलिवूडआलोकनाथ