बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. बॉलिवूड कारकिर्दीबरोबरच तिने राजकारणाची इनिंग देखील सुरू केली. उर्मिला मातोंडकर आज 47 वा वाढदिवस साजरा करीत आहे.
4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला. बालकलाकार म्हणून अॅक्टिंग करिअरची सुरुवात करणा-या उर्मिलाने पुढे रंगीला, सत्या, मस्त अशा अनेक सिनेमांत काम केले. वयाच्या 42 व्या वर्षी उर्मिलाने उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर उर्मिला बॉलिवूडपासून दूर आहे. पण एकेकाळी उर्मिला यशाच्या शिखरावर होती. याच काळात तिच्या आयुष्यात एका व्यक्तिची एन्ट्री झाली. असे म्हणतात की, याच व्यक्तिमुळे उर्मिलाचे करिअर उद्धवस्त झाले. ही व्यक्ती कोण तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.
होय, ‘रंगीला’ हिट झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात उर्मिला व राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटातून ऐनवेळी माधुरी दीक्षितला हटवून उर्मिला साईन केले आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चांना जोर चढला. पुढे राम गोपाल वर्मांच्या प्रत्येक सिनेमात उर्मिला झळकू लागली. उर्मिला व राम गोपाल वर्मा या दोघांपैकी कोणीच आपले संबंध स्वीकारले नाहीत. पण एक मात्र खरे की, राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलाला यशाच्या शिखरावर नेऊन उभे केले. पण पुढे याच राम गोपाल वमार्मुळे उर्मिलाच्या करिअरला ओहोटी लागली.
असे म्हटले जाते की, राम गोपाल वर्मांचे बॉलिवूडमधील इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत फारसे पटायचे नाही. याचा फटका उर्मिलाला बसला. राम गोपाल वर्मांमुळे अन्य दिग्दर्शकांनी उर्मिलाचा फारसा विचार केला नाही. याचा परिणाम म्हणजे, हळू हळू तिला काम मिळणे बंद झाले आणि उर्मिला दूर फेकली गेली.
2014 मध्ये ‘अजुबा’ या चित्रपटातून उर्मिलाने कमबॅक केले. पण तिचे हे कमबॅक अपयशी ठरले. 2018 मध्ये ‘ब्लॅकमेल’ सिनेमात एक आयटम साँग करताना दिसली. पण तिला कुणीही म्हणावे तसे नोटीस केले नाही. उर्मिलाने 2016 मध्ये कश्मिरी व्यावसायिक मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसिन उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. ती कार्यक्रमात अनेकदा पती मोहसिनसोबत दिसते.