Join us

Birthday Special: ‘या’ चित्रपटाने दिली विद्या बालनला नवी ओळख!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 4:18 PM

‘परिणीता’,‘कहानी’,‘डर्टी पिक्चर’,‘कहानी2’ यारख्या चित्रपटांतून नावारूपास आलेली अभिनेत्री विद्या बालन हिचा आज वाढदिवस. विद्याला तिच्या चित्रपटाच्या यशासाठी कुठल्याही लोकप्रीय पुरूष ...

‘परिणीता’,‘कहानी’,‘डर्टी पिक्चर’,‘कहानी2’ यारख्या चित्रपटांतून नावारूपास आलेली अभिनेत्री विद्या बालन हिचा आज वाढदिवस. विद्याला तिच्या चित्रपटाच्या यशासाठी कुठल्याही लोकप्रीय पुरूष कलाकाराची गरज नाही आणि ही गोष्ट तिने सिद्ध करून दाखवलीय. कामावरची निष्ठा आणि प्रतिभा असेल तर तुम्ही संपूर्ण चित्रपटात स्वबळावर उभा करू शकता, हे विद्याने तिच्या अनेक चित्रपटांमधून दाखवून दिलेय. विद्याबद्दल अशाच काही माहित नसलेल्या गोष्टी...मुंबईच्या चेंबूर येथे एका तामिळ कुटुंबात विद्याचा जन्म झाला. तिच्या घरात मल्याळम आणि तामिळ अशा दोन्ही भाषा बोलल्या जातात. माधुरी दीक्षित आणि शबना आझमी यांच्यापासून प्रेरित होऊन मी बॉलिवूडमध्ये जाणार, हे विद्याने अगदी लहानवयातच ठरवून टाकले होते. १६ वर्षांची असतानाच विद्याला एकता कपूरच्या ‘हम पांच’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.विद्याला चित्रपटात यायचे होते. पण हा मार्ग सोपा नव्हता. मल्याळम आणि तामिळ चित्रपटसृष्टीतही विद्याने बरेच प्रयत्न केलेत. पण ती अपयशी ठरली. बंगाली चित्रपट ‘भालो थेको’पासून विद्याला खरी ओळख मिळाली. यानंतर विद्याला ‘परिणीता’ चित्रपट मिळाला आणि विद्याने बॉलिवूडमध्ये पत्तऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटासाठी विद्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘गुरू’,‘सलाम ए इश्क’ यासारख्या अनेक चित्रपटात विद्या दिसली. पण तिला फारसी प्रसिद्धी मिळू शकली नाही.२००७ मध्ये आलेल्या ‘भूल-भुलैय्या’ या चित्रपटाने मात्र विद्याच्या करिअरला एक वेगळे वळण दिले. यानंतर २००९ मध्ये आलेला ‘पा’ आणि विशाल भारद्वाज यांचा ‘इश्किया’साठी विद्याने सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर आलेल्या ‘डर्टी पिक्चर’ने मात्र विद्याला आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत नेऊन बसवले. या चित्रपटातील भूमिकेसाठी विद्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. यानंतर विद्या ‘कहानी’ या चित्रपटात दिसली. यातील तिने साकारलेली दुर्गा रानी सिंह हिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावली. अलीकडे विद्याचा ‘कहानी2’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील विद्याच्या भूमिकेचेही कौतुक झाले.