Join us

Birthday Special: डिंपल कपाडिया यांच्याबद्दल पसरली होती ‘ही’ अफवा! नर्गिस यांना करावा लागला होता खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 6:30 AM

एकीकडे नवे नवे लग्न आणि दुसरीकडे ‘बॉबी’चे अपार यश असे सगळे अनुभवत असताना याचकाळात डिंपल यांच्याबद्दल एक अफवाही पसरली.

ठळक मुद्दे‘बॉबी’ रिलीज होण्याआधी डिंपल यांनी  लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या डिंपल राजेश खन्नासोबत विवाहबद्ध झाल्या.

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज (८ जून) वाढदिवस. १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या या अभिनेत्रीने आपले सौंदर्य आणि प्रतिभेच्या जोरावर स्टारडम मिळवले. सुपरस्टार राजेश खन्ना हेही या स्टारडमवर  भाळले. राज कपूर यांनी आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी  ‘बॉबी’ या चित्रपटाची निवड केली आणि या चित्रपटात हिरोईन म्हणून डिंपल यांची वर्णी लागली. ‘बॉबी’ प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. डिंपल नावाची ही नवी हिरोईन कोण, कुठली हे कळायच्या आधीच चाहते तिच्यासाठी अक्षरश: वेडे झालेत. ही नवी हिरोईन एका रात्रीत स्टार झाली.  पण ‘बॉबी’ रिलीज होण्याआधी डिंपल यांनी  लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या डिंपल राजेश खन्नासोबत विवाहबद्ध झाल्या.

एकीकडे नवे नवे लग्न आणि दुसरीकडे ‘बॉबी’चे अपार यश असे सगळे अनुभवत असताना याचकाळात डिंपल यांच्याबद्दल एक अफवाही पसरली. होय, ती अफवा म्हणजे, डिंपल कपाडिया नर्गिस आणि राज कपूर यांनी अनौरस संतान असल्याची.

डिंपल ही नर्गिस आणि राज कपूर यांची मुलगी आहे. त्यामुळे राज कपूर यांनी तिला ‘बॉबी’मध्ये लीड रोल दिला, अशी चर्चा त्यावेळी खूप रंगली.  डिंपल यांचा  लूक नर्गिस यांच्या फिल्मी लूकशी बराच साधर्म्य साधणारा होता. त्यामुळेही या चर्चेला बळ मिळाले. इतके की,  मीडियातील या चर्चांमुळे शाळेतील इतर मुले बोर्डिंगमध्ये शिकत असलेल्या संजय दत्तला टोमणे मारायचे. संजय दत्तला नर्गिस आणि डिंपल यांच्या नावावरुन चिडवायचे. या कारणामुळे संजय त्याची आई नर्गिस यांच्यावर नाराज राहू लागला होता. अर्थात  डिंपल यांच्याबद्दलची चर्चा निव्वळ अफवा असल्याचे लवकरच सिद्ध झाले. खुद्द नर्गिस यांनी यावर खुलासा केला.

  

एका मुलाखतीत नर्गिस यावर बोलल्या होत्या. ‘या अफवा कशा उठल्या याबद्दल मला ठाऊक नाही.  ‘बॉबी’तील डिंपलचा लूक माझ्या ‘आवारा’तील लूकशी मिळताजुळता आहे, त्यामुळे या कथा रचण्यात आल्या. अशा अफवा पसरवणे अतिशय मुर्खपणा आहे. देव न करो, पण जर असे घडले असते, तर मी माझ्या मुलीला नक्कीच स्वीकारले असते. डिंपल अतिशय समजूतदार मुलगी आहे. तिने या अफवा गमतीवर घेतल्या आणि त्याकडे दुर्लक्ष केले.  माझ्या पती आणि मुलांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा गॉसिप्सचा ताण घेऊन मला मरायचे नाही,’ असे त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :डिम्पल कपाडिया