Join us

'तसं एकदा नाही दोनदा घडलं होतं...' तेव्हापासून विनोद खन्ना यांच्यासोबत रोमॅन्टिक सीन द्यायला घाबरायच्या नट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 8:00 AM

रोमॅन्टिक सीन देताना विनोद खन्ना अनेकदा ‘आऊट ऑफ कंट्रोल’ होतं. माधुरी दिक्षितसोबतही असाच काहीसा भयानक किस्सा घडला होता.

ठळक मुद्दे ‘दयावान’च्या शूटींगवेळी असंच घडलं. माधुरीसोबत इंटिमेट सीन्स देताना विनोद इतके अनियंत्रित होतं की, त्यांना सांभाळणं कठीण होऊन जाई.

बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना ( Vinod Khanna)आज आपल्यात नाहीत. पण त्यांची अदाकारी, त्यांचे सिनेमे कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत असतील. आज त्यांचा वाढदिवस. 6 ऑक्टोबर 1946 साली पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद खन्नांचे वडील मोठे बिझनेसमॅन होते. पण फाळणी झाली आणि खन्ना कुटुंब भारतात आलं. 1968 साली विनोद खन्नांचा पहिला सिनेमा ‘मन की मीत’ हा सिनेमा रिलीज झाला आणि यानंतर कमाल झाली. होय, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यातच विनोद खन्ना यांनी एक-दोन नाही तर 15 नवे सिनेमे साईन केले. पण त्यांना खरी दिली ती गुलजार यांच्या ‘अचानक’ या सिनेमाने. यानंतर किमान 1982 सालापर्यंत तरी विनोद खन्नांनी कधीच मागे वळून बघितलं नाही.   जणू काही प्रत्यक्षात घडतंय, इतकं तल्लीन होऊन विनोद खन्ना प्रत्येक सीन देत. पण नेमक्या याच कारणामुळे विनोद खन्ना वादातही अडकले. होय, रोमॅन्टिक सीन देताना विनोद खन्ना अनेकदा ‘आऊट ऑफ कंट्रोल’ होतं. स्वत:वरचा ताबा गमावून बसतं. असं एकदा नाही तर दोनदा झालं होतं...

पहिला किस्सा डिंपल कपाडियासोबतचा (Dimple Kapadia). ‘मार्ग’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल आणि विनोद खन्ना यांच्यात एक इंटीमेट सीन्स शूट करायचा होता. या सीनमध्ये विनोद खन्ना यांना डिंपलला किस करायचं होतं. ठरल्यानुसार सीन्सला सुरुवात करण्यात आली; मात्र विनोद खन्ना यांचा स्वत:वरचा ताबा सुटला. दिग्दर्शकांनी कट-कट म्हटलं तरी ते डिंपलला किस करत राहिले.  शेवटी दिग्दर्शकांनाच धाव घेत विनोद खन्ना यांना बाजूला करावं लागलं. हा संपूर्ण प्रसंग डिंपल यांच्यासाठी खूपच शॉकिंग होता.  खरं तर आधी विनोद खन्ना यांनी डिंपलला मिठी मारून किस करत हा सीन पूर्ण केला होता. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक  महेश भट्ट या सीन्सवर समाधानी नव्हते. त्यांनी यात आणखी इंटेसिटी आणण्यासाठी आणखी एक टेक घेण्याचा निर्णय घेतला. मग काय विनोद खन्ना यांचा स्वत:वरचा ताबा सुटला.  महेश भट्ट  कट-कट म्हणून ओरडतं होते पण त्यांचा आवाज विनोद खन्नापर्यंत पोहोचलाच नव्हता. ही बाब विनोद यांच्या लक्षात आली आणि त्यांनी लगेचच डिंपलची माफी मागितली. परंतु भडकलेल्या डिंपलनंं विनोद यांना माफ करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. इतकंच नाही तर पुढच्या शूटिंगलाही स्पष्ट शब्दात नकार दिला.  महेश भट्ट यांनी डिंपलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण  डिंपल मानली नाही. अखेर हा चित्रपट रिलीजच होऊ शकला नाही.  नंतर या चित्रपटाचं नाव बदलून शूटिंग पूर्ण करण्यात आलं आणि 1992 मध्ये ‘प्रेम धरम’ या नावानं हा चित्रपट थेट होम व्हिडीओमध्ये रिलीज केला गेला. 

पुढे ‘दयावान’च्या शूटींगवेळी असंच घडलं. माधुरीसोबत (Madhuri Dixit) इंटिमेट सीन्स देताना विनोद इतके अनियंत्रित होतं की, त्यांना सांभाळणं कठीण होऊन जाई. एक किस सीन शूट करताना विनोद यांनी माधुरीच्या ओठांना चावा घेतल्याची चर्चाही त्यावेळी होती. या किसींग सीन्ससाठी माधुरीला बरीच टीका सहन करावी लागली होती.

टॅग्स :विनोद खन्नामाधुरी दिक्षितडिम्पल कपाडिया