Bithday special विजयता पंडितला घरातल्या वस्तू विकून भागवावा लागत होता घरखर्च, प्रसिध्द संगीतकारासोबत केले होते लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 02:49 PM2021-08-25T14:49:58+5:302021-08-25T15:02:00+5:30
विजयता पंडितचे दोन लग्न झाली आहेत. पहिले लग्न हे दोन वर्षातच मोडले म्हणून दुसऱ्यांदा लग्न केले.
८० च्या दशकात आपल्या अभिनय आणि गायनाने बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे विजयता पंडीत.कुमार गौरवसह अभिनेत्री विजेताने ‘लव्ह स्टोरी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.दोघांच्या अभिनयाचे कौतुकही झाले.सिनेमाही सुपरहिट ठरला. मात्र पहिल्या सिनेमानंतर अभिनेत्री विजयता मात्र सिनेसृष्टी फार काही कमाल दाखवू शकली नाही. विजयताबद्दल आजही लोकांना फार कमी माहिती आहे. करिअरप्रमाणे विजेताचे खाजगी आयुष्यातही तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
विजयताचे दोन लग्न झाली आहेत. पहिले लग्न हे दोन वर्षातच मोडले म्हणून दुसऱ्यांदा लग्न केले. दिवंगत संगीतकार आदेश श्रीवास्तवसह तिने दुसऱ्यांदा संसार थाटला पण नियतीच्या मनात काही ओरच होते. आदेश श्रीवास्तवचे कर्करोगाने निधन झाले आणि ती पुन्हा एकटी पडली.
पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या विजयताला जगण्यासाठी फार कष्ट करावे लागत असल्याचे समोर आले होते.गेल्या काही वर्षापासून ती आर्थिक अडचणीत होती. कमाईचं कोणतंही साधन नसल्यामुळे घरातल्या वस्तूच विकून आपला उदरनिर्वाह करावा लागत असल्याचे समोर आले होते.
विशेष म्हणजे संगित कुटुंबात विजयताचा जन्म झाला आहे. तिच्या वडिलांचे नाव प्रताप नरेन पंडित असून ते एक प्रसिद्ध संगीतकार होते. पंडित जसराज विजेताचे काका होते. सुलक्षणा पंडित, ललित पंडित, संध्या पंडित, मंदीर पंडित, जतिन पंडित आणि माया पंडित हे सात भावंडे आहेत. तिचे भाऊ जतिन-ललित हे बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आहेत.
सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर झाल्या त्यापैकीच विजयताही होती. फिल्मी करिअर आणि पर्सनल लाईफमुळेही विजयता चर्चेत असायची. कुमार गौरवसह अफेअरच्याही चर्चा प्रचंड रंगल्या होत्या. ४० वर्षानंतर तिने तिच्या या अफेअरवर पहिल्यांदाच मौन सोडले होते.
दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, जुन्या गोष्टींवर फार चर्चा करण्यात अर्थ नाही. कुमार गौरवसह खूप चागंले नाते होते. आमचे प्रेम लग्नापर्यंत पोहचू शकले नाही. कौटुंबिक कारणामुळे आम्ही लग्न करु शकलो नसल्याचे विजयताने म्हटले होते.