Join us

अक्षय कुमारचीही राजकारणात एन्ट्री? भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:58 PM

अक्षय कुमारला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे (Akshay Kumar, BJP)

अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयचे सिनेमे म्हणजे सुपरहिट असं समीकरणच लागू आहे. गेल्या काही महिन्यात अक्षयचे सिनेमे बॉक्स ऑफीसवर इतकी चमक दाखवू शकले नाहीत. अशातच अक्षयचा आगामी सिनेमा 'बडे मिया छोटे मिया' ची उत्सुकता शिगेला आहे. अक्षय सध्या या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने सगळीकडे फिरत आहे. सिनेमांच्या सुपरहिट कारकीर्दीनंतर अक्षय यंदा लोकसभा निवडणुक लढवण्याची चर्चा आहे.

मनोरंजन नामाने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या काही वर्षांपासून अक्षय राजकारणात प्रवेश करणार अशा बातम्या सुरु होत्या. पण या बातम्या निव्वळ अफवा आहेत, हे सिद्ध झालं. पण नुकत्याच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अक्षयला यंदा भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारलादिल्लीतील चांदनी चौक भागातून लोकसभा निवडणुकीची तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

अक्षय कुमार गेली अनेक वर्ष भाजपा पक्षाच्या कँपेनमध्ये दिसला. याशिवाय त्याने घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत सुद्धा चांगलीच गाजली. सध्यातरी अक्षय किंवा भाजपाकडून या बातमीचा खुलासा झाला नसला तरीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अक्षय दिल्लीतील चांदनी चौकातून निवडणूक लढवताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :अक्षय कुमारभाजपादिल्लीचांदनी चौकनरेंद्र मोदी