Join us

निवडणूक निकालापूर्वी हेमा मालिनी यांनी मथुरेतील राधा रमण मंदिरात केली पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:23 IST

मथुरेतून बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी निवडणूक लढवली आहे.

Lok Sabha Election Result 2024: देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूकीचा निकाल काही तासात स्पष्ट होणार आहे. सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. बॉक्सऑफिसवर कोणता सिनेमा चालला आणि कोणता फ्लॉप झाला हे ठरतं. पण आज काही सेलिब्रिटी हे लोकसभेच्याही रिंगणात आहेत. आज त्यांच्या सिनेमाचा नाही तर राजकीय निकाल लागणार आहे. मथुरेतून बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी निवडणूक लढवली आहे. सध्या मतमोजणीत हेमा मालिनी आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत हेमा मालिनी मथुरेतील राधारामन मंदिराला भेट दिली.

हेमा मालिनी यांनी यंदाही मथुरेतून निवडणूक लढवली. गेल्या दोन टर्मपासून त्या इथल्या भाजपाच्या खासदार आहेत. आता ही त्यांची तिसरी टर्म आहे.  तब्बल 38 हजारपेक्षा अधिक मतांनी त्या आघाडीवर आहेत. हेमा मालिनी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. यावेळी मथुरेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे मुकेश धनगर आणि बसपचे सुरेश सिंह निवडणूक लढवत आहेत. 

मंदिरात जाण्यापूर्वी अभिनेत्रीने उपस्थित लोकांशी संवाद साधला आणि हस्तांदोलन करून त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता. या खास प्रसंगी त्यांनी  बनारसी साडी परिधान केलेली दिसली. हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये अभिनेत्रीने मथुरा लोकसभेची जागा जिंकली होती. यंदा त्या बाजी मारतात की नाही,  हे लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :हेमा मालिनीसेलिब्रिटीबॉलिवूडलोकसभालोकसभा निवडणूक २०२४ निकाल