Join us

See Pics : आता अशी दिसते ‘ब्लॅक’ची छोटी मिशेल! २४ वर्षांत बनली उद्योजिका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 3:50 PM

होय, राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी, कुरळ्या केसांची, तीच ती दृष्टिहिन आणि कर्णबधिर मुलीची भूमिका साकारणारी मिशेल. या मिशेलचे खरे नाव आयशा कपूर.

ठळक मुद्दे‘ब्लॅक’ साठी आयशाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.  

बॉलिवूडचा ‘क्लासिक’ चित्रपट ‘ब्लॅक’ कोण बरे विसरू शकेल. संजय लीला भन्साळींचे दिग्दर्शन आणि अमिताभ बच्चनराणी मुखर्जी यासारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला आणि यादगार ठरला. ‘ब्लॅक’ पाहिलेल्या पे्रक्षकांना या चित्रपटातील छोटी मिशेल मॅकनेलीही आठवत असणारच. होय, राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी, कुरळ्या केसांची, तीच ती दृष्टिहिन आणि कर्णबधिर मुलीची भूमिका साकारणारी मिशेल. या मिशेलचे खरे नाव आयशा कपूर.ही मिशेल अर्थात आयशा कपूर आठवण्याचे कारण म्हणजे, आता ती २४ वर्षांची झाली आहे.  आयशाचे काही ताजे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

‘ब्लॅक’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकलेली आयशा सध्या एक उद्योजिका बनली असून  ‘आयशा एक्सेसरीज’ नावाचे लेबल चालवते.

‘ब्लॅक’ साठी आयशाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.  

एक उद्योजिका असण्यासोबतच एक लेखिका अशीही तिची ओळख आहे. फॅशन, हेल्थ, फॅशन आणि लाईफ स्टाईलवरचे आॅनलाईन ब्लॉग ती लिहिते. तिचे ब्लॉग आॅनलाईन वाचकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.

बॉलिवूडपासून दूर असली तरी आयशा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर रोज आपले नवे फोटो ती शेअर करत असते.

‘ब्लॅक’मध्ये आपल्या अदाकारीचे दर्शन घडवणारी आयशा ‘सिकंदर’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. या चित्रपटात आर माधवन, संजय सूरी, परजान दस्तूरसोबत ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत होती.

तूर्तास आयशा अ‍ॅडम ओबेरॉय नामक मुलाला डेट करतेय. म्हणजेच, आयशा आता सिंगल नाही तर रिलेशनशिपमध्ये आहे.

आयशाची आई जर्मन आहे आणि वडिल दिलीप कपूर हे चामड्यांच्या बॅग बनवणा-या ‘हड्सनग’ या आंतरराष्ट्रीय बॅ्रंडचे मालक आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनराणी मुखर्जी