Join us

काळी छाया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:07 AM

 मागील वर्षी 2015 च्या पहिल्या शुक्रवारी कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. मात्र दुसर्‍या शुक्र वारी 9 जानेवारीला बोनी ...

 मागील वर्षी 2015 च्या पहिल्या शुक्रवारी कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. मात्र दुसर्‍या शुक्र वारी 9 जानेवारीला बोनी कपूरचा 'तेवर' चित्रपट आला. ज्यात अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हाची जोडी होती. अर्जुन कपूरच्या या सोलो चित्रपटापासून फार अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुपर फ्लॉप ठरला. 2014 मध्ये पहिल्या शुक्रवारी अरशद वारसीचा 'जो बी करवालो' प्रदर्शित झाला, तर दुसर्‍या शुक्र वारी नसीरुद्दीन शाह आणि माधुरी दीक्षितचा 'डेढ. इश्किया' रिलीज झाला. दोन्हीही चित्रपटांचा एका आठवड्यात फ्लॉप चित्रपटांच्या यादीत समावेश झाला.2013ची सुरुवात राजीव खंडेलवालचा सस्पेंस चित्रपट 'टेबल नं. 21' पासून झाली आणि यानंतर विशाल भारद्वाजचा 'मटरु की बिजली का मंडोला' (इमरान खान, अनुष्का शर्मा आणि पंकज कपूर) प्रदर्शित झाला आणि दोघांचे परिणाम वाईट झाले. 2012 चा पहिला रिलीज चित्रपट 'प्लेयर' होता. अब्बास-मस्तानचा हा सस्पेंस थ्रिलर चित्रपट एवढय़ा वाईट अवस्थेत फ्लॉप राहिला की तीन वर्षात या जोडीने पुन्हा थ्रिलर चित्रपट नाही बनविला. 2010 मध्ये असेच काही 'दुल्हा मिल गया' या चित्रपटासोबत घडले. ज्याला शाहरुख खान, सुष्मिता सेन आणि फरदीन खान सारख्या चेहर्‍यांची चमकदेखील वाचवू शकली नाही. 2009 च्या सुरुवातीला असाच झटका अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोणला बसला.बॉलिवूडमध्ये कायम असलेल्या अंधविश्‍वासाचे अनेक किस्से आहेत. केवळ जानेवारीच नाही तर जानेवारी महिन्यातील पहिला शुक्रवारवरही जणू अपयशाची काळी छाया असल्यासारखे बघितले जाते. यंदाही तसेच घडत आहेत. नववर्षाच्या पहिल्या शुक्रवारी एकही नवीन चित्रपट नाही. याचा फायदा 'दिलवाले' आणि 'बाजीराव मस्तानी'ला होणार आहे. वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांना बॉक्स ऑफि सवर यश मिळाले नाही. म्हणूनच बॉलिवूडमध्ये वर्षाचा पहिला शुक्र वार 'अनलकी' मानला जातो.