Join us

Blackbuck Poaching Case : सोमवारच्या सुनावणीसाठी जोधपूरला रवाना झाला सलमान खान, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 10:13 AM

काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा झाल्याच्या एक महिन्यानंतर सलमान जोधपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी रवाना झाला आहे. सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

काळवीट शिकार प्रकरणी सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा जोधपूर न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यासाठी तो रविवारी दुपारीच आपल्या टीमसोबत जोधपूरला रवाना झाला आहे. जामीन मिळाल्याच्या एक महिन्यानंतर तो जोधपूर न्यायालयात सोमवारी हजर होणार आहे. यावेळी त्याच्या वकिलाकडून शिक्षेवर स्थगिती दिली जावी अशी मागणी केली जाणार आहे. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो काश्मीरमध्ये या चित्रपटातील एका रोमॅण्टिक गाण्याची शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतला आहे. रविवारी दुपारी जेव्हा तो न्यायालयात जाण्यासाठी विमानतळावर बघावयास मिळाला तेव्हा त्याच्या चेहºयावरील तणाव स्पष्टपणे दिसत होता. यावेळी तो टी-शर्ट आणि डेनिम लूकमध्ये बघावयास मिळाला. दरम्यान, गेल्या महिन्यात जोधपूरच्या सत्र न्यायालयाने सलमानला २० वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठाविला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सलमानची थेट जोधपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती; मात्र सलमानच्या वकिलांनी ४८ तासांच्या आतच त्याची जामिनावर सुटका केली होती. दरम्यान, या प्रकरणातील अन्य संशयित आरोपी सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम कोठारी यांची पुराव्याआभावी निर्दोष सुटका केली.  जोधपूर कारागृहात दोन दिवस घालविल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमानला ७ एप्रिल रोजी ५०-५० हजारांच्या दोन जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. यावेळी सलमानला न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर न जाणे आणि सुनावणीसाठी हजर राहणे अशा दोन अटी घातल्या होत्या. त्यानुसार सलमान सोमवारच्या सुनावणीसाठी जोधपूरला रवाना झाला आहे.