बॉक्स आॅफिसवरील ब्लॉकबस्टर चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 11:09 AM
१९४३ ची घटना आहे. जेव्हा बॉम्बे टॉकिजचा अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला ‘किस्मत’ हा चित्रपट रिलीज झाला होता. ...
१९४३ ची घटना आहे. जेव्हा बॉम्बे टॉकिजचा अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला ‘किस्मत’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स आॅफिसवर इतिहास रचला होता. कित्येक महिने या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला होता. अर्थात ही घटना स्वातंत्र्यापूर्वीची होती. स्वातंत्र्यानंतरही बरेचसे असे चित्रपट आले, ज्यांनी बॉक्स आॅफिसवर एकहाती सत्ता गाजविली; मात्र गेल्या काही काळातील विचार केल्यास ‘बाहुबली-२’ सोडला तर एकही चित्रपट एक किंवा दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ बॉक्स आॅफिसवर तग धरू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर बॉक्स आॅफिसवर कित्येक महिने आणि वर्ष दबदबा निर्माण करणाºया ब्लॉकबस्टर चित्रपटांचा घेतलेला हा आढावा... दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक आठवडे सिनेमागृहात चालणारा चित्रपट आहे. २० आॅक्टोबर १९९५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने दिवस, महिने नव्हे तर वर्षानुवर्ष सिनेमागृहात आपली छाप सोडली. आजही मुंबईतील मराठा मंदिर येथे या चित्रपटाचे शो सुरू आहेत. हा चित्रपट रिलीज होऊन एक हजारांपेक्षा अधिक आठवडे झाले आहेत. शोलेजय, वीरू, ठाकूर, कालिया, सांबा, बसंती, धन्नो आणि गब्बर असे अनेक पात्र अजरामर करणाºया ‘शोले’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त दबदबा निर्माण केला होता. १५ आॅगस्ट १९७५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने एक इतिहास रचला आहे. मुंबईतील मिनर्व्हा थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल पाच वर्षं चालला. जवळपास २८६ आठवडे या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मुगल-ए-आजमदिलीप कुमार, मधुबाला आणि पृथ्वीराज कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळातील सर्वाधिक महागडा चित्रपट होता. चित्रपटाने १५० आठवडे पूर्ण केले. दिलीपकुमार आणि मधुबाला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. संगीत आणि भव्य सेट्समुळे हे या चित्रपटाने त्याकाळी धूम उडवून दिली होती. बरसात २१ एप्रिल १९४९ रोजी रिलीज झालेला ‘बरसात’ हा सुपरस्टार राज कपूर यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तब्बल शंभर आठवडे पूर्ण करताना इतिहास रचला. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटानंतर राज कपूर यांनी आर. के. स्टुडिओ खरेदी केला होता. याच चित्रपटाच्या पोस्टरमधून आर. के. स्टुडिओचा लोगो घेतलेला आहे. मैने प्यार किया२९ डिसेंबर १९८९ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटानेही बॉक्स आॅफिसवर वर्चस्व निर्माण केले होते. अभिनेता सलमान खान याचा हा पहिलाच चित्रपट होता. सुरुवातीला चित्रपटाच्या २९ प्रिंट रिलीज करण्यात आल्या होत्या. या चित्रपटाने तब्बल ५० आठवडे चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राजा हिंदुस्तानीआमीर खान आणि करिष्मा कपूर यांच्या ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. १५ नोव्हेंबर १९९६ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटातील ‘परदेसी परदेसी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. या गाण्यामुळेच चित्रपटाला यश मिळवून दिल्याचे मत समीक्षकांकडून व्यक्त करण्यात आले होते. कहो ना प्यार हैहृतिक रोशन याचा पहिलाच चित्रपट असलेल्या ‘कहो ना प्यार है’ने बॉक्स आॅफिसवर धमाल केली होती. १४ जानेवरी २००० मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसला एक सुपरस्टार मिळवून दिला. हृतिकची डान्स स्टाइल आणि अॅक्शन प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. शिवाय बॉलिवूडमध्येही त्याचे आगमन धडकी भरविणारे ठरले. या चित्रपटाने तब्बल एक वर्ष चित्रपटगृहांमध्ये आपला दबदबा निर्माण केला.