Join us

"बाबा हवं तसं जगले पण माझी आई...", बॉबी देओलने व्यक्त केल्या भावना; म्हणाला, 'माझी पत्नी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:49 IST

माझ्या आईवडिलांच्या संस्कारांमुळेच आज मी... बॉबी देओल काय म्हणाला?

'आश्रम' वेबसीरिज गाजवल्यानंतर 'ॲनिमल' सिनेमामुळे अभिनेता बॉबी देओलचं (Bobby Deol)  नशीबच पालटलं. काही वर्षांच्या ब्रेकनंतर तो पुन्हा सिनेसृष्टीत सक्रीय झाला. बॉबीला खलनायकाच्या ऑफर्स येऊ लागल्या. साउथमध्येही त्याने काम केलं. सध्या बॉबी आणि सनी या देओल बंधूंची चलती आहे. नुकतंच बॉबीने एका मुलाखतीत वडील धर्मेंद्र आणि आई प्रकाश कौर यांच्याबद्दल विधान केलं आहे.

'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, " माझ्या आईवडिलांच्या संस्कारांमुळेच आज मी जो काही तो आहे. माझ्या पत्नीचाही मला खूप पाठिंबा मिळाला आहे. माझ्या वडिलांनी त्यांचं आयुष्य परिपूर्ण जगलं. त्यांना हवं तसंच ते जगले. हॉलिवूडचं गाणं आहे did it my way ते माझ्या वडिलांसाठी चपखल बसतं. यात त्यांना माझी आई प्रकाश कौरची साथ लाभली. ती कायम त्यांच्यासाठी उभी राहिली. माझ्या यशात त्या दोघांचाही मोठा वाटा आहे. तसंच माझ्या पत्नीचीही मोठी भूमिका आहे. ती प्रत्येक पावलावर माझ्यासोबत होती. चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रसंगी तिने माझी साथ सोडली नाही. अगदी तसंच जसं माझ्या आईने वडिलांना साथ दिली. माझी पत्नी तान्याने माझ्यावर कायम विश्वास ठेवला. मी काहीतरी चांगलं करु शकतो हा विश्वास तिनेच मला दिला."

बॉबी देओल आगामी 'हाऊसफुल ५' मध्ये दिसणार आहे. 'कंगुआ' या साउथ सिनेमातही तो दिसला. याशिवाय तो YRF च्या 'अल्फा' सिनेमात काम करत आहे. यामध्ये आलिया भट आणि शर्वरी वाघ अॅक्शन सीन्स देणार आहेत. बॉबी वयाच्या ५६ व्या वर्षीही फिट असून एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत आहे.

टॅग्स :बॉबी देओलबॉलिवूडधमेंद्र