'लॉर्ड' बॉबी देओल (Bobby Deol) मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या 'आश्रम ३'च्या ( Aashram ) दुसऱ्या भागाचा प्रीमिअर महाशिवरात्रीला २६ फेब्रुवारी रोजी झाला. या वेब सीरिजच्या इतर सिझनप्रमाणेच हा नवीन भागसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आहे. प्रेक्षकांना बाबा निरालाच्या भूमिकेतील बॉबी देओलचं अभिनय खूप आवडलंय. नुकतंच आयफा २०२५ पुरस्कार सोहळ्यात बॉबी देओलने 'आश्रम'सीरिजच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. 'आश्रम ३'नंतर आता बॉबी देओल 'ॲनिमल पार्क'मध्ये (Animal Park) दिसणार आहे. 'ॲनिमल पार्क' सिनेमासंदर्भात अभिनेत्यानं नुकतंच भाष्य केलं.
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या हिट चित्रपटात बॉबी देओलने अबरार ही भूमिका साकारली होती. नकारात्मक भूमिका त्यानं खूप चांगल्या प्रकारे साकारली होती. यासाठी अभिनेत्याचे खूप कौतुक झालं. अलिकडेच 'अॅनिमल पार्क' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना बॉबी म्हणाला, "मला का नको असेल? जेव्हा मी अॅनिमलमध्ये काम केलं, तेव्हा मला माहितही नव्हते की त्याचा सिक्वेल 'अॅनिमल पार्क' येईल". अर्थात 'अॅनिमल पार्क'मध्ये बॉबी देओलची भुमिका असणार आहे.
बॉबीने बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूड व्यतिरिक्त त्याच्या दाक्षिणात्य चित्रपट 'डाकू महाराज'चीही सध्या खूप चर्चा होत आहे. नंदमुरी बालकृष्ण यांच्या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. बॉबी देओलचे अनेक चित्रपट यापुढे येणार आहेत. तो लवकरच हाऊसफुल ५, अल्फा आणि दोन तेलुगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
'अॅनिमल पार्क'बद्दल बोलायचं झालं तर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी पटकथेवर काम सुरू केलं आहे. पॅन इंडिया स्टार प्रभाससोबत 'स्पिरिट' चित्रपटाचं शुटिंग पूर्ण होताच 'अॅनिमल पार्क'चे शुटिंग सुरू होईल. चाहते 'अॅनिमल पार्क'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'मिड डे'नुसार, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रथम नितेश तिवारीच्या 'रामायण' आणि नंतर संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर'चे काम पूर्ण करेल, त्यानंतर तो 'अॅनिमल पार्क'वर काम सुरू करेल. अॅनिमल पार्क २०२६ पर्यंत थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.