करिना कपूरने धोका दिल्यानेच बॉबी देओलचे करिअर झाले उद्ध्वस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 11:07 AM
अभिनेता बॉबी देओल याने बºयाच काळानंतर ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटातून कमबॅक केले. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटातूनही त्याला नाकारले. बॉबी ...
अभिनेता बॉबी देओल याने बºयाच काळानंतर ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटातून कमबॅक केले. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटातूनही त्याला नाकारले. बॉबी गेल्या काही काळापासून एकही चित्रपट आला नव्हता, त्यामुळे प्रेक्षक त्याला विसरले तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. वास्तविक बॉबीने बºयाचदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात तो अयशस्वी झाला. ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देणाºया बॉबी देओलचे फिल्मी करिअर अशाप्रकारे अडचणीत येईल, असा कोणीही विचार केला नव्हता. एकेकाळी सुपरस्टार म्हणविणाºया बॉबीला आता चित्रपटात घेताना निर्माते विचार करतात. बॉबीवर असा प्रसंग का यावा, याचाच उलगडा आज आम्ही करणार आहोत. यामागे करिना कपूरचा हात असून, बॉबीचे करिअर उद्ध्वस्त होण्यामागे ती कशी कारणीभूत ठरली हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वास्तविक बॉबी जेव्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा त्याला एका दमदार कथेचा शोध होता. २००७ मध्ये त्याचा शोधही संपला. कारण इम्तियाज अली त्यावेळी ‘जब वी मेट’च्या कथेवर काम करीत होते. त्यांनी या चित्रपटासाठी बॉबीसोबत चर्चाही केली होती. जेव्हा बॉबीने ‘जब वी मेट’ची स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्याने लगेचच त्यास होकार दिला. पुढे त्याने याविषयी करिनासोबत चर्चा केली. तिला इम्तियाज अली यांच्याकडे घेऊनही गेला. मात्र बॉबीचा हा निर्णय त्याच्याच अंगलट आला. करिनाला भूमिका देण्याच्या नादात त्याला या चित्रपटापासून दूर जावे लागले. होय, जेव्हा करिना इम्तियाज अली यांच्याकडे आली अन् त्यांनी तिला स्क्रिप्ट ऐकविली तेव्हा तिने लगेचच त्यास होकार दिला. परंतु तिला या चित्रपटात बॉबीऐवजी शाहिद कपूरसोबत काम करायचे होते. मी बॉबीऐवजी शाहिदची अभिनेत्री म्हणून काम करेल, असे तिने इम्तियाज यांना सांगितले. त्यावेळी इम्तियाज यांनीदेखील हा चित्रपट बनविण्याचा पूर्ण निर्णय घेतला होता, त्यामुळे त्यांनी करिनाचे म्हणणे ऐकले, अन् बॉबीचा पत्ता कट करीत शाहिदला संधी दिली. बॉबीचा पत्ता कट झाल्याने तो पुन्हा एकदा आपल्या करिअरच्या गाडीला पटरीवर आणण्यासाठी धडपड करू लागला. पुढे ‘जब वी मेट’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. लोकांनी चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शविली. हा चित्रपट आजही शाहिद कपूरचा बेस्ट चित्रपट समजला जातो. आता थोडासा विचार करा की, जर करिनाने बॉबीला अशाप्रकारे धोका दिला नसता तर कदाचित आज बॉबी देओल इंडस्ट्रीमध्ये त्याची इमेज निर्माण करू शकला असता.