Join us  

Namrata Malla Hot Dance: Besharam Rang चा वाद शमेना, तोच नम्रताने समुद्रकिनारी केला भलताच Bold डान्स, तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 7:48 PM

नम्रताचा बीचवर केलेला बिकीनी डान्स प्रचंड व्हायरल होताना दिसतोय...

Besharam Rang Namrata Malla Hot Dance: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे जितके जास्त पसंत केले जात आहे, तितकेच ते ट्रोल होत आहे. गाण्यातील काही दृश्यांवरून सुरू असलेला वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीए. अनेक संघटनांनी निर्मात्यांवर हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. हे सारे वाद सुरू असताना अभिनेत्री नम्रता मल्ला नुकताच एक आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आजकाल लोक नम्रता मल्ला या नावाशी परिचित आहेत. कारण या भोजपुरी अभिनेत्रीने अल्पावधीत आपल्या बोल्ड लूकने आणि बिनधास्त स्टाईलने तरूणाईला वेडं केलं आहे. बेशरम रंग गाण्यावरून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही, तोच नम्रताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या अदांनी तिने डान्स मुव्ह्स केल्या आहेत. नम्रताने बेशरम रंग या गाण्यावर डान्स करून सर्वांचीच जिंकलीत असं म्हणता आलं असतं, पण तिने भगवी बिकीनी घातल्याने हा व्हिडीओ काहीसा वादात येईल की काय अशीही चर्चा आहे.

नम्रता मल्लाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ऑरेंज बिकिनी घालून हॉट डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. बेशरम रंग हे सध्या गाजत असून त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या गाण्यात दीपिकाने ज्याप्रकारे भगवी बिकिनी परिधान करून खूप बोल्डनेस दाखवला आहे, त्याचा खूप विरोध होत आहे. पण या वादांची पर्वा न करता, नम्रता मल्ला देखील भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सही दोन्ही बाजूने कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे- 'केशरी बिकिनी घालण्याची हिम्मत कशी झाली?'. तर दुसरीकडे, दुसरा युजर म्हणतो- समुद्रात आंघोळ केल्यावर तू आणखी छान दिसत्येस. एका युजरने तर असेही विचारले आहे की- ' आता बॉयकॉट गँग कुठे आहे'.

कोण आहे नम्रता मल्ला?

नम्रता मल्ला ही भोजपुरी अभिनेत्री असली तरी ती सोशल मीडियावर तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. कधी ती बिकिनीमध्‍ये हॉट डान्‍स दाखवते तर कधी ती अतिबोल्ड फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. नम्रता देखील बिकिनीमध्ये बोल्ड फोटोशूट करून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. नुकतीच ती मोनोकिनीवर परिधान करून दागिने घालून दिसली होती. तिच्या त्या लूकची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

टॅग्स :पठाण सिनेमाबॉलिवूडदीपिका पादुकोणसोशल व्हायरल