Join us

बोल्ड अँड ब्यूटीफूल! 'द क्रू' सिनेमातील तब्बू - करिना - क्रितीच्या फर्स्ट लूकवरुन उठला पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 15:40 IST

आगामी 'क्रू' सिनेमातील तब्बू, करिना, क्रितीच्या लूकची पहिली झलक समोर आलीय.

 'द क्रू' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे. करिना कपूर, (Kareena Kapoor) तब्बू (Tabu) आणि क्रिती सेनन या तीन अभिनेत्रींची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा एक घोषणा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत करिना, तब्बू, क्रिती (Kriti Sanon) पाठमोऱ्या एअरपोर्टवर चालताना दिसल्या. आता नुकतंच या सिनेमातला या तिघींचा पहिला लूक समोर आलाय.

 'द क्रू' सिनेमात करिना - तब्बू - क्रिती बोल्ड अँड ब्यूटीफूल अंदाजात पाहायला मिळत आहेत. लाल रंगाचा गणवेश. डोक्यावर टोपी, लाल लिपस्टिक अशा अंदाजात या तिघी दिसत आहेत. आम्ही उडायला सज्ज आहोत? तुम्ही तयार आहात? अशा कॅप्शनमध्ये तिघींचा लूक शेअर करण्यात आलाय. क्रिती - तब्बू - करिनाच्या या लूकवर चाहत्यांनी चांगलीच पसंती दिलीय.

 'द क्रू' सिनेमाच्या काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या टीझरमध्ये करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये दिसल्या होत्या. टीझरमध्ये 'खलनायक' या सुपरहिट चित्रपटातील 'कुक कुक कुक... चोली के पीछे क्या है' गाण्याची झलक दिसते.  हा चित्रपट एअरलाइन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांवर आधारित आहे. ज्यामध्ये एअर होस्टेसचे ग्लॅमर, संघर्ष दाखवण्यात येणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरक्रिती सनॉनतब्बूबॉलिवूड