"बिरंगे...", अजय देवगणच्या 'आझाद'मधील पहिल्या गाण्याची झलक समोर; राशा-अमनच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 04:43 PM2024-12-11T16:43:18+5:302024-12-11T16:48:00+5:30

'सिंघम अगेन' नंतर अभिनेता अजय देवगणचा 'आझाद' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

bollywood actor ajay devgan share rasha thadani and aman devgan azaad movie first song birangay teaser full song out soon  | "बिरंगे...", अजय देवगणच्या 'आझाद'मधील पहिल्या गाण्याची झलक समोर; राशा-अमनच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

"बिरंगे...", अजय देवगणच्या 'आझाद'मधील पहिल्या गाण्याची झलक समोर; राशा-अमनच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Ajay Devgan Azaad Movie: 'सिंघम अगेन' नंतर अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) बहुप्रतीक्षित 'आझाद' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ॲक्शन जॉनर सिनेमाद्वारे अजयचा पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी फिल्मी दुनियेत पदार्पण करणार आहेत. अलिकडेच 'आझादचा एक जबरदस्त टीझर रिलीज करण्यात आला. त्यात आता या सिनेमातील नव्या गाण्याची झलक दाखवण्यात आली आहे. 'आझाद' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहे. येत्या १७ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान, नुकताच सोशल मीडियाद्वारे आझाद मधील नव्या गाण्याचा एक शॉर्ट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याची पोस्टही अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया हॅंडलवर शेअर केल्याची पाहायला मिळतेय. 

'आझाद' चित्रपटात अजय देवगण, राशा तडानी,अमन देवगण यांच्यासह अभिनेत्री डायना पॅंटी सुद्धा मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या गाण्यातील राशा-अमनची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. अभिनेता अजय देवगणने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे 'बिरंगे' गाण्याचा टीझर शेअर केलाय. शिवाय "चारों ओर बिखरेंगे प्यार के रंग बिरंगे के संग..." असं लक्षवेधी कॅप्शन अभिनेत्याने व्हिडीओला दिलं आहे.  

नुकताच 'आझाद' चित्रपटातील टीझर सोशल मीडियावर समोर आला आहे. संपूर्ण गाणं उद्या रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Web Title: bollywood actor ajay devgan share rasha thadani and aman devgan azaad movie first song birangay teaser full song out soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.