Join us

जालियनवाला बाग हत्याकांडाचे सत्य उलगडणार; अक्षय कुमार- आर.माधवनच्या 'केसरी-२' चा ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:51 IST

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये देशभक्तीपर चित्रपटांचा ट्रेण्ड आला आहे.

Kesari-2 Trailar: गेल्या काही वर्षांमध्ये बरेच देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. करण सिंग त्यागी दिग्दर्शित असाच एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे 'केसरी-२' आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीत या चित्रपटाची चर्चा आहे. केसरी-२ मध्ये अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) आर. माधवन (R.Madhvan) आणि अनन्या पांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'केसरी-२' या चित्रपटात अक्षय कुमार ब्रिटिश काळातील प्रसिद्ध भारतीय वकील सर सीएस नायर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अशातच नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

'केसरी-२' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात जालियनवाला बाग  हत्याकांडाच्या न्यायालयीन सुनावणी आणि त्याच्याशी संबंधित कथानकाने होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये अनेक मन हेलावून टाकणारे प्रसंग पाहायला मिळत आहे. यात अक्षय कुमारचा हा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाबद्दल  प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर टीझर, पोस्टरनंतर केसरी-२ सिनेमाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, 'केसरी-२' हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये १९१९ च्या हत्याकांडामागील सत्य उलगडण्यासाठी बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. 'केसरी-२' चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केलं आहे. तर धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे. येत्या १८ एप्रिलला सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :अक्षय कुमारआर.माधवनअनन्या पांडेबॉलिवूडसिनेमा