Join us

'हाऊसफुल-५' च्या सेटवर अक्षय कुमारला दुखापत; अ‍ॅक्शन सीक्वेंस करताना झाला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:16 IST

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत असलेला 'हाऊसफुल-५' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत असलेला 'हाऊसफुल-५' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिले चार सीक्वेल्स सुपरहिट ठरले. परंतु आगामी सीरिज कशी असणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, 'हाऊसफुल-५' या चित्रपटाचं शूट परदेशात स्पेनमध्ये सुरू आहे. या शूटिंगदरम्यान बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग थांबण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शुटिंगवेळी अ‍ॅक्शन सीक्वेंस करत असताना अभिनेत्याच्या डोळ्याला मार लागला आहे, असं सांगण्यात येतंय. या घटनेनंतर लगेच सेटवर नेत्ररोग तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. नेत्ररोग तज्ज्ञांनी अभिनेत्याला काही काळ विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय इतर सहकलाकारांनी त्यांच्या शूटिंगला सुरूवात केल्याचंही कळतंय. लवकरच अभिनेताही सेटवर जॉईन होईल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. कारण चित्रपटाचं शूटिंग अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, याबाबत अक्षय कुमार किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

बहुचर्चित आणि मल्टिस्टारर 'Housefull 5' हा सिनेमा ६ जून २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने वेलकमनंतर अक्षय कुमार आणि नाना पाटेकर अनेक वर्षांनी एकत्र येणार आहेत. साजिद नाडियाडवाला निर्मित 'Housefull 5 मध्ये दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे.  यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, डिनो मोरिया यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा