गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बी अर्थात अमिताभ बच्चन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर चाहत्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण करणारे बिग बी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असतात. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांची कायमच चर्चा रंगत असते. मात्र, यावेळी बिग बींऐवजी त्यांच्या मराठमोळ्या बॉडीगार्डची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
अनेक वर्षांपासून जितेंद्र शिंदे हे बिग बींचं अंगरक्षकाचं काम करत होते. त्यामुळे बिग बी जिथे जातील तेथे ते सावलीप्रमाणे वावरत होते. त्यामुळे सहाजिकच त्यांना मिळणारं मानधनदेखील तितकंच होतं. मात्र, त्यांच्या मानधनामुळेच ते अडचणीत आले आहे. सध्या बलाढ्य मानधन घेतल असल्यामुळे त्यांची चौकशी सुरु आहे.
'या' कालाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर
जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन महिन्याला तब्बल ११ लाख रुपये पगार देतो होते. मात्र, जितेंद्र शिंदे यांना मिळणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
दरम्यान, जितेंद्र शिंदे कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आज त्यांच्या दारापुढे अनेक गाड्या असून ते एका आलिशान घरात राहत असल्याचं म्हटलं जातं. जितेंद्र शिंदे यांची स्वत:ची सुरक्षा एजन्सी आहे. मात्र, ते कायम बिग बींसोबत वावरत असल्याचं पाहायला मिळालं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या पगार हा एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओ इतकाच असल्याचं पाहायला मिळतं.