Join us  

बॉलिवूडचा खतरनाक खलनायक! ४५० चित्रपटांमध्ये केलं काम, व्हिलन साकारून केली हिरोंची हवा टाईट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 3:35 PM

बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी यांचे जगभर चाहते आहेत.

Bollywood Actor Amrish Puri Story: बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी यांचे जगभर चाहते आहेत. आज ते आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील. अमरीश पुरी यांनी ४५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. खरं तर इतर अभिनेत्यांप्रमाणे तेही हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण निर्मात्यांनी त्यांचा चेहरा पाहून त्यांना हिरोची भूमिका नाकारली होती. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. पुढे खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग हेही अमरीश यांच्या कामाच्या प्रेमात पडले होते.

अमरीश पुरी पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारत असले तरी खऱ्या आयुष्यात ते फार शांत स्वभावाचे होते. फक्त हिंदी चित्रपट नाही तर त्यांनी कन्नड, पंजाबी, तेलगू, तमिळ, इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा अभिनय पाहून भल्याभल्या अभिनेत्यांची बत्ती गुल व्हायची असं सांगितलं जातं. 

मीडिया रिपोर्टनूसार, अमरिश पुरी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ मध्ये क्लर्कची नोकरी केली. पण, त्यांच्या नशीब पलटलं आणि  मनोरंजन विश्वात त्यांचं नाव झालं. आजही हिंदी सिनेसृष्टीत त्याचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं.

४५० चित्रपटांमध्ये केलं काम -

१९७६ ते  २००५ या कालावधीत त्यांनी जवळपास ४५० चित्रपटांत काम केलं. दिग्दर्शक ते बोलतील ती रक्कम देऊन त्यांच्याकडून सिनेमे साईन करून घ्यायचे. पुढे खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली. एकवेळ अशी होती की, अमरिश पुरी चित्रपटात काम करण्यासाठी नायकापेक्षा अधिक मानधन मिळत असे. 

अमरिश पुरी यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील बलदेव सिंग, 'करण अर्जुन' मधील दुर्जन सिंग, 'गदर एक प्रेम कथा' मधील अशरफ अली, 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील मॉगॅम्बो, 'नायक' चित्रपटातील मुख्यमंत्री यांसारख्या त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

टॅग्स :अमरिश पुरीबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीप्रेरणादायक गोष्टी