Join us

“ज्यांना खोटं बोलून..,” काश्मीर फाईल्सला बकवास म्हणणाऱ्या प्रकार राज यांना अनुपम खेर यांचे खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 19:48 IST

अलीकडेच अभिनेके प्रकाश राज यांनी 'द काश्मीर फाइल्स'वर प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे टीका केली आणि ती 'प्रपोगंडा फिल्म' असल्याचे म्हटले होते.

अलीकडेच, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध स्टार प्रकाश राज यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'वर प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे टीका केली आणि ती 'प्रपोगंडा फिल्म' असल्याचे म्हटले होते. याचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर प्रकाश राज यांनाही विवेक अग्निहोत्री यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या विषयावर आता अनुपम खेर यांनी प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले.

“काही लोकांना आयुष्यभर खोटं बोलावं लागतं. काही लोक आयुष्यभर सत्य बोलतात. आयुष्यभर सत्य बोलणाऱ्या लोकांपैकी मी एक आहे. ज्याला खोटं बोलून जगायचं असतं, त्याची इच्छा असते,” असं अनुपम खेर प्रकाश राज यांच्या त्या वक्तव्यावर म्हणाले. नवभारत टाईम्सशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी प्रकाश राज यांच्यावर टीकेचा बाण सोडला. 

काश्मीर फाईल्सला म्हणाले होते बकवास“'द कश्मीर फाइल्स हा एक बकवास चित्रपट आहे. आपल्याला माहित आहे की त्याची निर्मिती कोणी केली. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्याच्यावर टीका करतात आणि तरीही मला ऑस्कर का मिळत नाही, असा सवाल दिग्दर्शक करत आहेत. त्यांना ऑस्करही मिळणार नाही. मी तुम्हाला सांगतोय, कारण त्या ठिकाणी संवेदनशील माध्यमं आहेत आणि इथे तुम्ही प्रोपगंडा फिल्म करत आहात,” असं प्रकाश राज म्हणाले होते. 

विवेक अग्नीहोत्रींचंही प्रत्युत्तर'काश्मीर फाइल्सने शहरी नक्षलवाद्यांची रात्रीची झोप अशाप्रकारे उडवली आहे की त्यांच्यातील एक पिढी वर्षभरानंतरही अस्वस्थ आहे, असं विवेक अग्निहोत्री म्हणाले होते.

‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा गेल्यावर्षीच्या सर्वाधिक यशस्वी झालेल्या चित्रपटांपैकी एक होता. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित या चित्रपटानं बक्कळ कमाई केली. ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 

टॅग्स :अनुपम खेरप्रकाश राजबॉलिवूडविवेक रंजन अग्निहोत्री