Join us  

ठाण्यात अभिनेता अर्जुन कपूरचा भन्नाट डान्स; ढोल वाजवत खेळला गरबा: Video आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 2:58 PM

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे.

Arjun Kpoor Garba Dance : सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. दरम्यान, नवरात्रीत सर्वांचे मोठे आकर्षण असते ते म्हणजे तरुणाईचे गरबानृत्य आणि दांडिया. सर्वसामान्यापासून सेलिब्रिटीही या उत्सावात सहभागी होत असतात. दरम्यान, सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा गरबा नृत्य करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या अभिनेता अर्जुन कपूर सिंघम अगेन चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच नवरात्रोत्सवानिमित्ताने अभिनेत्याने ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर ढोल-ताशा वाजवताना दिसतो आहे. या शिवाय तरुणांसोबत गरबा नृत्य देखील करत आहे. 

या नवरात्रोत्सवात अभिनेत्याचा पारंपरिक लूक चाहत्यांच लक्ष वेधत आहे. त्यासोबतच अर्जुनने तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी डान्स करतानाही दिसतोय. त्याच्या या साधेपणाचं कौतुक होत आहे. 

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरबॉलिवूडनवरात्रीठाणेसोशल मीडिया