Join us

"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 16:20 IST

अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

Arjun Kapoor Post : अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. रंगभूमी गाजवणारा हरहुन्नरी अभिनेत्याने जगाचा निरोप घेतल्याने त्यांचे चाहते भावुक झाले आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनेसोशल मीडियावरअतुल परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने लिहलंय, "मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी कधी मिळाली नाही, पण, त्यांनी कोणतीही भूमिका साकारली तरीही त्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद मिळायचा. गेली अनेक वर्षे त्यांनी कॅन्ससारख्या आजाराशी झुंज देत त्यावर मात केली.पण, त्यांची ती झुंज अपयशी ठरली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..."

अतुल परचुरेंच्या निधनाने शोककळा

मराठी तसेच हिंदी मनोरंजनविश्वात नाव गाजवलेले हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं काल ५७ व्या वर्षी निधन झालं. नाटक, मालिका, सिनेमे अशा सर्वच माध्यमात अतुल परचुरेंनी विविधांगी भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या परचुरेंनी पुढे  अनेक मालिका, सिनेमे ते थेट कपिल शर्माशोपर्यंत उत्कृष्ट भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अतुल परचुरेंच्या निधनाने मनोरंजन विश्वातील एक तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

टॅग्स :अतुल परचुरेअर्जुन कपूरबॉलिवूडमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया