Ayushmann Khurrana: आयुषमान खुराणा (Ayushmann Khurrana) एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम गायकदेखील आहे. अभिनयाबरोबर तो आपली गायनाची आवडही कायम जपताना दिसतो. सध्या आयुषमानचे परदेशात कॉन्सर्ट सुरू आहेत. आतापर्यंत त्याने शिकागो, न्यूयॉर्क या ठिकाणी लाईव्ह शोज केले आहेत. त्याच्या कॉन्सर्टला चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. दरम्यान, आयुषमानला न्यूयॉर्कमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करताना एका विचित्र अनुभव आला. भर स्टेजवर परफॉर्मन्सदरम्यान अभिनेत्यावर चाहत्यांनी अमेरिकन डॉलर फेकले. चाहत्यांच्या या कृतीला विरोध दर्शवत आयुषमानने परफॉर्मन्समध्येच थांबवून त्यांना विशिष्ट असा सल्ला दिला. अभिनेत्याच्या या कृतीचं सागळेच कौतुक करत आहेत. नेमंक आयुषमानने या कॉन्सर्टमध्ये काय केलं? जाणून घेऊया.
सोशल मीडियावर आयुषमान खुरानाचा कॉन्सर्टदरम्यानचा तो व्हिडीओ समोर आला आहे. 'viralbhayani' या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक डॉलरचा वर्षाव करण्याऱ्या चाहत्याला अभिनेता आवाहन केलं आहे. त्या दरम्यान आयुषमान त्याला म्हणतो, "कृपया असं काही करू नका. तुम्ही हे पैसे (अमेरिकन डॉलर) चॅरिटीमध्ये दान करा. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमाचा आणि सन्मानाचा मी आदर करतो. अगदी निसंकोचपणे हे डॉलर (पैसे) तुम्ही दान करा." असा सल्ला त्याने या चाहत्याला दिला.
आयुषमान खुराणाच्या या वक्तव्याने चाहत्यांची मनं जिंकली. शिवाय सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच एका यूजरने आयुषमानच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलंय, "एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान असं अपमानास्पद वागणूक देणं हे खूप वाईट आहे."
आयुषमान खुराणाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने ड्रीम गर्ल-२ चित्रपटात केलेल्या कामाचं आजही कौतुक होत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.