Tanya Deol Networth : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा 'अॅनिमल' हा सिनेमा चांगलाच गाजला. त्याच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचले. या चित्रपटामध्ये त्याने केलेल्या कामाचं सगळ्यांनीच तोंडभरून कौतुक केलं. 'अॅनिमल'च्या यशानंतर बॉबी देओलसोबत त्याची पत्नीही अनेक ठिकाणी स्पॉट झाली. अप्रतिम सौंदर्य, स्टाईलिश आणि हजरजबाबी वाटणारी तान्या देओल काय करत असेल? असा अनेकांना प्रश्न पडला होता.
नुकतीच इन्स्टाग्रामवर 'मार्केंटिंग ग्रोमेटिक्स' नावाच्या एका अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये तान्या देओलबाबत अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तान्या देओल एक इंटीरिअर डिझायनर आहे. तिचं स्वत: चं फर्निशिंग स्टोअर देखील आहे. सध्याच्या घडीला तान्या यशस्वी बिझनेसवूमन म्हणून ओळखली जाते.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टनुसार, तान्याचे वडील प्रसिद्ध असे उद्योजक आहेत. त्यांच नाव देवेंद्र अहुजा आहे. शिवाय त्यांच नाव देशातील टॉप बॅंकर्सच्या यादीत येतं.
वडिलोपार्जित संपत्ती तान्याच्या नावावर -
मिळालेल्या माहितीनुसार, तान्याच्या वडिलांच निधन २०१० मध्ये झालं. त्यांच्या मृत्यूनंतर ३०० कोटी रुपयांची संपत्तीची वारसदार तान्या आहे.
दरम्यान, बॉबी देओलच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याची एकुण संपत्ती ६६ कोटी इतकी आहे. हे कपल सध्या मुंबईतील विले-पार्ले येथे वास्तव्यास आहे.