Join us

तब्बल १२ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय 'हा' बॉलिवूडचा चार्मिंग बॉय; अक्षय कुमारसोबत करणार स्क्रीन शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:35 IST

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण केली.

Dino Morea : अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण केली. काहींना चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळाल्या आणि त्यांना स्टारडमही मिळाला.  पाहायला गेल्यास बॉलिवूडमध्ये असे कित्येक अभिनेते आहेत ज्यांनी हातावर मोजण्याइतकेच चित्रपट केले अन् लोकप्रिय झाले, यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) . 'प्यार में कभी कभी' आणि 'राझ’ या हॉरर चित्रपटामुळे डिनो मोरियाला खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील त्याची आणि अभिनेत्री बिपाशा बसूची केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर अभिनेत्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला. आता जवळपास १२ वर्षानंतर  डिनो मोरिया मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. 

डिनो मोरियाने त्याच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंग करत केली. त्यानंतर अभिनेत्याने टीव्हीवर काम केलं आणि मग बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. वेगवेगळ्या हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम, तेलुगू चित्रपटांमध्ये सुद्धा तो झळकला आहे. 'कॅप्टन व्योम' ही त्याची पहिली मालिका होती. या मालिकेनंतर त्याच्यासाठी नशीबाचे दरवाजे खुले झाले. यानंतर त्याला राझ चित्रपटाची ऑफर मिळाली आणि त्याचं नशीब फळफळलं. एकेकाळी डिनो बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जायचा. दमदार अभिनय आणि त्याच्या लूकमुळे चाहत्यांमध्ये अभिनेत्याची क्रेझ होती.

'राझ' चित्रपटाने मिळाली खरी ओळख

डिनो मोरियाने राजेश खन्ना यांची लेक रिंकी खन्नासोबत 'प्यार मे कभी कभी' चित्रपटात स्क्रीन शेअर केली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. पण, 'राज' या सिनेमाने त्याली खरी ओळख मिळाली. २००२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे डिनो रातोरात स्टार झाला. 

आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्याने जवळपास ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  'गुनाह', 'अक्सर' और 'टॉम', डिक एंड हैरी' या चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला. परंत फ्लॉप चित्रपटामुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली आणि डिनो इंडस्ट्रीतून गायब झाला. अलिकडेच 'द अंपायर' या वेबसिरीजमध्ये तो झळकला. त्यानंतर आता जवळपास १२ वर्षानंतर अभिनेता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. २०१२ मध्ये 'जोडी ब्रेकर्स' चित्रपटानंतर त्याने ब्रेक घेतला. आता साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी 'हाउसफुल्ल-५' मधून तो मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 

टॅग्स :डिनो मोरियाबॉलिवूडसेलिब्रिटी