Join us

"अब प्रहार होगा...", 'ग्राऊंड झिरो'चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित; इमरान हाश्मी-सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:13 IST

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) त्याच्या चित्रपटांसह हटके भूमिकांमुळे चर्चेत येत असतो.

Emraan Hashmi : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) त्याच्या चित्रपटांसह हटके भूमिकांमुळे चर्चेत येत असतो. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांने बॉलिवूडमध्ये वेगळं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ‘फूटपाथ’ या चित्रपटातून इमरानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, हा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर इमरानचा 'मर्डर' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. सध्या इमरान हाश्मी त्याच्या आगामी 'ग्राऊंड झिरो' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता वाढली आहे. 

सोशल मीडियावर 'एक्सेल एंटरटेन्मेंट'च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर 'ग्राऊंड झिरो' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. "शौर्य, त्याग आणि एक ध्येय ज्याने सर्वकाही बदलले...", असं कॅप्शन देत हा टीझर चाहत्यांसोबत शेअर करण्यात आला आहे. हा टीझर पाहून कोणाच्याही अंगावर 

'ग्राऊंड झिरो' मध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात  इमरान बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांची  भूमिका साकारताना दिसणार आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :इमरान हाश्मीसई ताम्हणकरबॉलिवूडसिनेमासोशल मीडिया