Join us

"माधुरीसोबत 'तो' सीन शूट करताना एकच भीती होती की..."; गोविंद नामदेव यांनी सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:20 IST

"माधुरीसारख्या नंबर १ अभिनेत्रीसोबत 'तसा' सीन शूट करताना एकच भीती होती की..."; गोविंद नामदेव यांनी सांगितली आठवण

Govind Namdev: अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) यांनी हिंदी सिनेृष्टीमध्ये  चित्रपटांसह मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका वठवल्या आहेत. 'सौदागर','आँखे', 'सरफरोश','सत्‍या', 'वॉन्टेड' अशा चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखत गोविंद नामदेव यांनी 'प्रेम ग्रंथ' या सिनेमात माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) काम करण्याचा अनुभव सांगितला.शिवाय त्या चित्रपटातील रेप सीन(Rape Scene) संदर्भात सुद्धा भाष्य केलं आहे.

'हिंदी रश'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेते गोविंद नामदेव यांनी 'प्रेम ग्रंथ' मधील रेप सीन शूट करतानाचा किस्सा शेअर केला आहे. त्यादरम्यान, मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "मी तर या सीननंतर माधुरीचा फॅन झालो. जेव्हा कोणी नवीन कलाकार नर्व्हस असतो, तेव्हा अशी सांभाळून घेणारी सहकलाकार मिळाली तर कोणीही शंभर टक्के नक्की देणार. खरंतर असं कुठेही होत नाही. कारण कोणतीही अभिनेत्री आपल्या कामाकडे लक्ष देत असते. परंतु माधुरीने सुरुवातीला खूपच मदत केली."

पुढे अभिनेते म्हणाले, "त्यावेळी आम्ही हा सीन जवळपास चित्रपटाच्या शेवटी शूट केला. मी नेहमीच तिला म्हणायचो की, मला हा सीन तुझ्यासोबत करायचा आहे, त्यावर उत्तर देत माधुरी म्हणायची, हा ठीक आहे. तिच्या बोलण्यामुळे मला हिंमत मिळाली. मला वाटायचं की, आपल्याकडून कुठे गडबड होता कामा नये कारण जेव्हा तुम्ही एका टॉप अॅक्ट्रेससोबत असा कोणताही सीन शूट असता तेव्हा काहीही चुकीचं घडू नये. परंतु माधुरीमुळे सगळं काही सहज शक्य झालं."

'प्रेम ग्रंथ' या सिनेमाचं दिग्दर्शन राज कपूर यांनी केलं आहे. हा सिनेमा १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'प्रेम ग्रंथ'मध्ये अभिनेते ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका होती. 

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा