Harshvardhan Rane New Film: बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांची मुख्य भूमिका असलेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट आता पुनःप्रदर्शित करण्यात आला आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, आता ७ फेब्रुवारीला चित्रपट रि-रिलीज केल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. दरम्यान, आता व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने हर्षवर्धन राणेने चाहत्यांना अनोखं खास सरप्राईज दिलं. 'सनम तेरी कसम' नंतर हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा रोमॅंटिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी हर्षवर्धन राणेने त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या अपकमिंग प्रोक्टबद्दल माहिती देणारी खास पोस्ट शेअर केल्याची पाहायला मिळतेय. 'दीवानियत' असे या चित्रपटाचे नाव असून, हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन राणेने सोशल मिडियावर या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "दीवानियत फिल्म कहानी है, प्यार और हार्टब्रेक की ये कहानी साल 2025 में सिनेमाघरों में आने वाली है...." दरम्यान, या पोस्टमध्ये चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
दिग्दर्शक मिलाप जावेरी 'दीवानियत' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर मुश्ताक शेख यांनी चित्रपटाचं कथानक लिहिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारं चित्रपटाचं पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये हर्षवर्धन राणेच्या या आगामी चित्रपटाबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.