अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री सबा आझादला (Saba Azad) डेट करत आहे आणि आता गेल्या काही दिवसांपासून हे दोघे यासंदर्भात बरेचसे ओपनही झाल्याचे दिसत आहेत. माध्यामांत येत असलेल्या काही वृत्तांनुसार, हे दोघे लवकरच लग्नबंधनातही अडकू शकतात. काही दिवसांपूर्वी सबा आणि हृतिक परदेशात सुट्टीवर गेले होते. याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. तर जाणून घेऊयात, हृतिक आणि सबा यांच्या रिलेशनशिपला केव्हा झाली सुरुवात आणि हे जोडपे केव्हा करू शकते लग्न...
Hrithik-Saba लग्न करणार? -यासंदर्भात कसल्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, माध्यमांत आलेल्या वृत्तांमध्ये म्हणण्यात आले आहे, की ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) लवकरच सात फेरे घेऊ शकतात. फिल्मफेअरने (Filmfare) नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यात केवळ, ऋतिक लवकरच सबासोबत लग्न करू शकतो, असे लिहिले आहे. मीडिया इंडस्ट्रीमध्ये ही अफवा अत्यंत वेगाने पसरत आहे.
Bejan Daruwalla यांनी केलं होतं प्रेडिक्शन -खरे तर, ऋतिक अथवा सबा यांच्याकडून यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजर बेजान दारुवाला (Bejan Daruwalla) यांनीही, येणाऱ्या काही दिवसांत ऋतिक रोशन (Hrithik Roshan) दुसऱ्यांना लग्नाच्या बंधनात अडकू शकतो, असे प्रेडिक्शन केले होते. ऋतिकने आपली पहिली पत्नी सुजैन खानला डायव्हर्स दिल्यानंतर, हे प्रेडिक्शन करण्यात आले होते.
Hrithik आणि Saba ची रिलेशनशीप -हृतिक पहिल्यांदा सबासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला होता. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. यानंतर, करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत या जोडप्याने पहिल्यांदा अधिकृतपणे कॅमेऱ्यासमोर एकत्रपणे पोज दिली होती. जेव्हा दोघेही परदेशात फिरण्यासाठी गेले होते, तेव्हाचे काही फोटो सबाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर (Saba Azad Instagram) पोस्ट केले होते. ऋतिकच्या सर्व फॅमिली फंक्शन्समध्येही सबा दिसून आली आहे.