बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने गतवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सुपरहिट सिनेमांसह बॉक्स ऑफिसवर धमाकेदार वापसी केली. त्याआधी दीर्घकाळ हृतिक रूपेरी पडद्यापासून दूर होता. ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सिनेमांच्या यशानंतर हृतिकचे नाव काही मोठ्या प्रोजेक्टसोबत जोडले जात आहे. अर्थात अद्याप यापैकी कुठल्याही प्रोजेक्टची अधिकृत घोषणा झालेली नाही. नुकतेच हृतिकने उदयपुरमध्ये एका इव्हेंटसाठी हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने वॉर व सुपर ३० चित्रपटाबद्दल सांगितले.
हृतिक रोशन म्हणाला की, "वॉर आणि सुपर ३० या सिनेमातील दोन्ही भूमिका कठीण होत्या. कबीर आणि आनंद या दोघांचे मन एकच आहे. यातील कोणाला एकाला बघून आपलं मत बनवू नका. मी बघितलं आहे की माणसे एकसारखी असतात मात्र त्यांच्या वागण्यावरून ती वेगळी ठरतात."
ऋतिक रोशनने सुपर 30 मधील गणितज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेने सर्वांना हलवून टाकले होते. त्यानंतर, चाहत्यांनी वॉरमधील कबीरच्या भूमिकेचेही खूप कौतुक केले होते, सुपर 30 मधील गणितज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेहुन 'वॉर'मधील कबीरची भूमिका वेगळी होती.